IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये आज सेमीफायनलचा सामना झाला. यात कोलकाताने दिल्लीवर ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. दिल्लीच्या संघाने शिखर धवनच्या ३६ धावांच्या जोरावर २० षटकात १३५ धावा केल्या होत्या. KKR ने सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५१) आणि शुबमन गिल (४६) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर हे आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केले.
पाहूया DC vs KKR सामन्याचे Highlights :-
---------------------------------------------------------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
KKR ने केली 'दिल्ली' काबीज; CSK शी खेळणार फायनल!
१३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने शेवटच्या षटकात विजय मिळवला. शेवटच्या चार षटकात दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या षटकात रविचंद्रन अश्विनने दोन गडीही बाद केले. पण राहुल त्रिपाठीने षटकार लगावत KKRचा विजय साजरा केला. दिल्लीचे पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. KKR चा संघ शुक्रवारी CSK शी फायनलमध्ये भिडणार आहे.
---------------------------------------------------------------------------
शुबमन गिलचं अर्धशतक हुकलं; पण कोलकाता विजयासमीप
नितीश राणा स्वस्तात (१३) बाद झाल्यावर शुबमन गिलवर साऱ्यांच्या नजरा होत्या. पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. ४६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार खेचत ४६ धावा काढून तो बाद झाला. त्याला आवेश खानने माघारी धाडले.
---------------------------------------------------------------------------
दमदार अर्धशतकानंतर व्यंकटेश अय्यर माघारी
कोलकाताच्या व्यंकटेश अय्यरने दिल्लीच्या अनुभवी गोलंदाजांची धुलाई करत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर खेळीत आणखी एका चौकाराची भर घालून तो ५५ धावांवर बाद झाला.
---------------------------------------------------------------------------
कोलकाताच्या सलामीवीरांची धडाकेबाज सुरूवात
१३६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी दमदार सुरूवात केली.
---------------------------------------------------------------------------
दिल्लीकर गोंधळले; कोलकातापुढे १३६ धावांचे लक्ष्य
जीवनदान मिळालेला शिमरॉन हेटमायर (१७) धावचीत झाल्यानंतर दिल्लीचे फलंदाज फारशी फटकेबाजी करू शकले नाहीत. संपूर्ण डावात दिल्लीचे फलंदाज गोंधळलेले दिसले. श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत पिचवर टिकून राहत नाबाद ३० धावा केल्या आणि संघाला १३५ पर्यंत मजल मारून दिली.
दिल्ली - शिखर धवन - ३६ (३९), श्रेयस अय्यर - ३०* (२७)
कोलकाता - वरूण चक्रवर्ती - २६ / २
---------------------------------------------------------------------------
धवन पाठोपाठ पंत बाद; दिल्लीची मदार श्रेयस अय्यरवर
धवन बाद झाल्यानंतर लगेचच ऋषभ पंतदेखील झेलबाद झाला. पिचवर आल्यापासूनच त्याने फटकेबाजीचा प्रयत्न केला आणि त्यातच तो स्वस्तात बाद झाला. त्याने ६ चेंडूत ६ धावा केल्या.
---------------------------------------------------------------------------
शिखर धवन बाद; दिल्लीचा तिसरा गडी तंबूत
संयमी खेळी करणारा दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन अखेर झेलबाद झाला. खेळपट्टीचा अंदाज घेत खेळणारा धवन धावगती वाढवण्याच्या नादात फटका खेळला आणि शाकीब अल हसनने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. धवनने ३९ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या.
---------------------------------------------------------------------------
मार्कस स्टॉयनीस 'क्लीन बोल्ड'; दिल्लीला दुसरा धक्का
शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनीस या दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असताना स्टॉयनीस बाद झाला. कोलकाताच्या युवा शिवम मावीने त्याला त्रिफळाचीत करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. स्टॉयनीसने २३ चेंडूत एका चौकारासह १८ धावा केल्या.
---------------------------------------------------------------------------
दिल्लीला पहिला धक्का; पृथ्वी शॉ माघारी
पहिल्या ४ षटकात दमदार फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. १२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह १८ धावा करून तो वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
---------------------------------------------------------------------------
दिल्लीकरांची दमदार सुरूवात
दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. ४ षटकात दिल्लीने ३२ धावा कुटल्या.
---------------------------------------------------------------------------
Toss Update
DC vs KKR Live: कोलकाताची टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी. दिल्लीच्या संघातून टॉम करनला डच्चू. अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनीसला संघात स्थान.
---------------------------------------------------------------------------