IPL 2021 Second Phase In UAE : गतवर्षी UAE च्या मैदानात झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या ब्रँड संघाचा अक्षरश: बँण्ड वाजला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जला प्ले-ऑफमध्येही स्थान मिळवता आले नव्हते. पण १४ व्या हंगामात धोनीच्या संघाने दमदार कमबॅक केले. आयपीएल स्पेशलिस्ट रैनाचं कमबॅक आणि युवा जोश आणि अनुभवी खेळाडूंनी बहरलेल्या संघानं भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात पिवळ्या जर्सीतील चेन्नई सुपर किंग्जमध्ये विजयाची धमक पुन्हा एकदा दाखवून दिली. ७ सामन्यात त्यांनी 5 विजय नोंदवले आहेत. त्यांच्या पदरी जे दोन पराभव आले त्यात नेहमीच त्यांना तगडी फाईट देणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासह नव्या उमेदीनं खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा समावेश आहे.
चेन्नईकडून खेळणारा फाफ ड्युप्लेसीस कॅरेबियन लीगमध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसला. या स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यात त्याला दुखापत झाल्यामुळे चेन्नईसमोर नवे आव्हान निर्माण होऊ शकते. पहिल्या टप्प्यात फाफ आणि ऋतूराज गायकवाड या जोडीनं चेन्नईच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिल्याचे पाहायला मिळाले होते. शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि रविंद्र जाडेजा या भारतीय त्रिकूटामुळे धोनीच्या संघाची ताकद निश्चित वाढेल. याशिवाय हेजलवूडच्या रुपात नवे ट्रम्पकार्ड धोनीच्या ताफ्यात असेल. त्याचा वापर धोनी कसा करणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
पहिल्या टप्प्यातील चेन्नईचे सामने आणि निकाल
चेन्नई वि. दिल्ली - दिल्ली ७ गडी राखून विजय
चेन्नई वि. पंजाब- चेन्नई ६ गडी राखून विजय
चेन्नई वि. राजस्थान- चेन्नई सुपर किंग्ज ४५ धावांनी विजय
चेन्नई वि. कोलकाता- चेन्नई सुपर किंग्ज १८ धावांनी विजय
चेन्नई वि. बंगळुरु- चेन्नई ६९ धावांनी विजय
चेन्नई वि. हैदराबाद -चेन्नई ७ गडी राखून विजय
चेन्नई वि. मुंबई -मुंबई 4 गडी राखून विजय
पहिल्या टप्प्यानंतरचा गुणतक्ता
१. दिल्ली - ८ सामन्यांत १२ गुण
२. चेन्नई - ७ सामन्यांत १० गुण
३. बंगळुरू - ७ सामन्यात १० गुण
४. मुंबई - ७ सामन्यात ८ गुण
------------------------------------------
५. राजस्थान - ७ सामन्यात ६ गुण
६. पंजाब - ८ सामन्यात ६ गुण
७. कोलकाता - ७ सामन्यात ४ गुण
८. हैदराबाद - ७ सामन्यात २ गुण
दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी चेन्नईचा संघ
महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक आणि कर्णधार), चेतेश्वर पुजारा, सीएच निशांथ, फाफ ड्युप्लेसीस, एन जगदीशन (यष्टिरक्षक), ऋतूराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, ड्वेन ब्रावो, भगत वर्मा, कृष्णाप्पा गौथम, मिचेल सँटनर, मोईन अली, रविंद्र जाडेजा, सॅम कुरेन, दीपक चाहर, ऋषिकेश रेड्डी, इम्रान ताहिर, जोश हेजलवूड, करन शर्मा, केएमअसिफ, लुंगी एनिग्डी, आर साई किशोर, शार्दुल ठाकूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.