युएईच्या मैदानातील दुसऱ्या टप्प्यातील दिमाखदार खेळीनं कोलकाता नाइट रायडर्सने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करुन ते पुन्हा एकदा ट्रॉफी उंचवण्यासाठी उत्सुक असतील. या प्रवासात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. प्ले ऑफच्या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी मिस्ट्री स्पिनरने पहिल्या टप्प्यात आलेला भयावह अनुभव शेअर केलाय.
आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामने हे भारतात खेळवण्यात आले. बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ही स्पर्धा निम्म्यावरच स्थगित करण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची लागण होणारा तो पहिला खेळाडू होता. त्याच्यापाठोपाठ अन्य काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात ही स्पर्धा युएईच्या मैदानात रंगत आहे.
पहिल्या टप्प्यातील स्पर्धेतेवेळी वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स या दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. त्यानंतर वरुण चक्रवर्तीला मोठा मानसिक त्रास झाला. Mental Health Day च्या निमित्ताने त्याने याकाळात आलेले अनुभव शेअर केले आहेत. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर लोक वरुण चक्रवर्तीला दोष देत होते. तुझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही, असही काही नेटकऱ्यांनी वरुणला म्हटले.
अनुभव शेअर करताना वरुण म्हणाला की, डॉ. श्रीकांत यांनी फोनवरुन कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे माहिती दिल्याचे आजही आठवते. हे ऐकून मी कोलमडून गेलो. त्यानंतर ईमेल आणि इन्स्टाच्या माध्यमातून मला ट्रोल करण्यात आले. काही लोक मी मरावे अशी भाषा वापरत होते, असा भयावह अनुभव वरुण चक्रवर्तीनं शेअर केला. Mental Health Day च्या निमित्ताने कोलकाता नाइट रायडर्सने एक व्हिडिओ शेअर केलाय. यात वरुण चक्रवर्ती, अभिषक नायर आणि दिनेश कार्तिक यांनी सोशल मीडियावरील ट्रोल झाल्याने अनुभव शेअर केले आहेत. सध्याच्या जगात कोणत्याही कारणास्तव तुम्हाला ट्रोल करण्यात येऊ शकते. #WorldMentalHeathDay दिवशी ट्रोलिंगपासून वाचण्याचा संकल्प करुया असा संदेश कोलकाताच्या संघाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.