IPL

VIDEO : नॉर्तजेचा 'नखरेल' चेंडू; वॉर्नर गोंधळला

डेविड वॉर्नरचा दिल्ली विरुद्ध पुन्हा फ्लॉप शो, नॉर्तजेनं खाते उघडू दिले नाही

सुशांत जाधव

IPL 2021: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामन्यात डेविड वॉर्नचा पुन्हा एकदा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतेलल्या हैदराबादची सुरुवातच खराब झाली. त्यामुळे निर्धारित 20 षटकात त्यांना कशीबशी 9 बाद 134 पर्यंत मजल मारता आली. अब्दुल समदने हैदराबादकडून सर्वाधिक 28 धावांची खेळी केली तर राशिद खानने 22 धावांची उपयुक्त खेळी केली.

नॉर्तजे आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. हैदराबादचे 3 फलंदाज रन आउट झाले. हैदराबादच्या डावातील पहिल्या षटकात एनरिक नॉर्तजे (Anrich Nortje) उसळत्या चेंडूवर डेविड वॉर्नर चांगलाच गडबडला. वॉर्नर चेंडू डिफेन्स करण्याच्या तोऱ्या दिसला. पण नोर्तजे 147.00 kph वेगाने फेकलेल्या चेंडू वॉर्नरला जज करता आला नाही. चेंडू बॅटला लागून उंच उडाला. अक्षर पटेलन सोपा झेल सहज टिपला.

नॉर्तजेनं आपल्या गोलंदाजी दरम्यान 151.37, 150.83, 149.97, 149.29, 148.76 kph वेगाने चेंडू फेकल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 151.37 kph वेगाना टाकलेला चेंडू यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. यंदाच्या हंगामात यापूर्वी रबाडाने 148.73 kph वेगाने चेंडू टाकला होता.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकणारे गोलंदाज

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्यामध्ये नॉर्तजे दुसशर्या स्थानावर आहे. शेन टेटने 157.7 Kph चेंडू फेकला आहे. त्याच्यापाठोपाठ नॉर्तजे, डेल स्टेन आणि रबाडा यांचा नंबर लागतो.

1. शॉन टेट – 157.7 Kph

2. एनरिक नॉर्तजे – 156.2 Kph

3. एनरिक नॉर्तजे – 154.8 Kph

4. डेल स्टेन- 154.40 Kph

5. कागिसो रबाडा- 154.20 Kph

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT