IPL 2022 : कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ मुंबईतील ब्रेब्रॉर्नच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात तीन बदलासह मैदानात उतरला. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन स्टार बॅटर एरॉन फिंचला (Aaron Finch) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. त्याच्याशिवाय कोलकाता संघात शेल्डन जॅक्सनसह आणि अमन खान या दोघांना संधी देण्यात आली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 10 संघ आहेत. ऑस्ट्रेलियन स्टारसाठी कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) हा पदार्पणाचा सामना आहे. याआधी त्याने आठ संघाच्या जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.
2010 च्या हंगामात एरॉन फिंच राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. 2011-12 मध्ये त्याने दिल्ली डेअरडेविल्स (सध्याच्या दिल्ली कॅपिटल्स), 2013 मध्ये पुणे वॉरियर्स, 20114 मध्ये सनरायजर्स हैदराबाद, 2015 मुंबई इंडियन्स तर 2016-17 मध्ये तो गुजरात लायन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले. 2018 आणि 2020 मध्ये त्याने अनुक्रमे पंजाब आणि बंगळुरुचे प्रतिनिधीत्व केले होते.
वेगवेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावे आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात नवव्या फ्रेंचायझीकडून तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्याने संघाच्या डावाची सुरुवात केली. पण त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. मार्को जेसन याने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याचा काटा काढला. एरॉन फिंच कोलकाताकडून पदार्पणाच्या सामन्यात 7 धावा करुन परतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.