इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 25 व्या सामन्यापूर्वी खेळाडूंसाठी केलेल्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने स्पर्धा पुन्हा संकटात सापडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ शनिवारी 16 एप्रिलला स्पर्धेतील पुढचा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही बाब दिल्ली कॅपिटल्ससह अन्य फ्रेंचायझीला धडकी भरवणारी आहे. (IPL 2022 Delhi Capitals Physio Patrick Farhart Tests Positive For Covid 19)
आयपीएल (IPL) आयोजकांनी अधिकृत निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट COVID-19 पॉझिटिव्ह आहेत. ते सध्या ते दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मेडिकल टीमच्या निरिक्षणाखाली क्वारंटाईनमध्ये आहेत. जवळपास आठवडाभर त्यांना क्वारंटाईन रहावे लागणार आहे. याशिवाय अन्य कोणाचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही, असे आयोजकांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे 2019 मध्ये आयपीएलची संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात रंगली होती. त्यानंतर 2020 मध्ये भारतात स्पर्धेला सुरुवात झाली. पण कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आणि त्यानंतर अन्य संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने स्पर्धेला ब्रेक लागला. उर्वरित सर्व सामने पुन्हा युएईच्या मैदानात स्थलांतरित करण्यात आले होते.
कोरोनासंदर्भातील नियमावलीचं पालन करत पुन्हा एकदा आयपीएलच्या स्पर्धेला भारतात सुरुवात झालीये. कोरोनामुळे यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील सर्व लढती या महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई येथील चार स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. खेळाडूंसह स्टाफ सदस्यांना कोरोनाच्या नियमावलीचे कठोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही कोरोनाचा शिरकाव कसा झाला? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थितीत होताना दिसतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.