अखेर निकोलस पूरनची 34 चेंडूत केलेली 62 धावांची खेळी शार्दुल ठाकूरने संपवली. अखेर दिल्लीने हैदराबादला 20 षटकात 8 बाद 186 धावात रोखले.
दिल्लीचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात असताना निकोलस पूरनने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले.
खलील अहमदने दिल्लीला सहावा धक्का दिला. त्याने सेअन एबॉटला 7 धावांवर माघारी धाडत आपला तिसरा मोहरा टिपला.
माक्ररम आणि पूरनने हैदराबादचा डाव सावरला असताना खलील अहमदने माक्ररमला 42 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
अवघ्या 37 धावात तीन फलंदाज माघारी गेल्यानंतर अॅडम माक्ररम आणि निकोलस पूरनने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला 12 व्या षटकात नव्वदी पार करून दिली.
दिल्ली कॅपिटल्सच्या 207 धावांचा पाठलाग करताना सनराईजर्स हैदराबादची सुरूवात खराब झाली. अभिषेक शर्मा (7), केन विल्यमसन (4) हे स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीला देखील फारशी चमक दाखवता आली नाही. त्याची मिशेल मार्शने 22 धावांवर शिकार केली.
डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 122 धावांची भागीदारी रचत दिल्लीला 20 षटकात 3 बाद 207 धावांपर्यंत पोहचवले. डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हनमध्ये आक्रमक फलंदाजी करत पॉवेलने 35 चेंडूत 67 धावा केल्या.
डेव्हिड वॉर्नरने आपली जुनी फ्रेंचायजी सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध झुंजार अर्धशतक ठोकले.
ऋषभ पंतला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने 16 चेंडूत 26 धावा केल्या मात्र श्रेयस गोपालने त्याचा त्रिफळा उडवला.
एबॉटने मिशेल मार्शला 10 धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला.
भुवनेश्वर कुमारने दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने मनदीप सिंहला शुन्यावर बाद केले.
सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने सनराईजर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर दिल्ली गुणतलिकेत आता डबल डिजिटमध्ये गेली आहे. दिल्लीने हैदराबादसमोर 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हैदराबादला 20 षटकात 8 बाद 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून खलील अहमदने 3 तर शार्दुल ठाकूरने दोन विकेट घेतल्या. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज 92 धावा केल्या तर रोव्हमन पॉवेलने 67 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 62 धावा केल्या. त्याला माक्ररमने 42 धावा करून चांगली साथ दिली.
दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची पॉवर प्लेमध्येच घसरगुंडी उडाली. अभिषेक शर्मा (7), केन विल्यमसन (4) हे स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीला देखील फारशी चमक दाखवता आली नाही. त्याची मिशेल मार्शने 22 धावांवर शिकार केली.
अवघ्या 37 धावात तीन फलंदाज माघारी गेल्यानंतर अॅडम माक्ररम आणि निकोलस पूरनने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला 12 व्या षटकात नव्वदी पार करून दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 60 धावांनी भागीदारी रचली.
मात्र ही जोडी खलील अहमदने फोडली. त्याने माक्ररमला 42 धावांवर बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेला शशांक सिंह 10 तक एबॉट 7 धावांची भर घालून परतला. एकाकी झुंज देणाऱ्या निकोलस पूरनने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र धावा आणि चेंडू यातील अंतर वाढत चालले होते. अखेर निकोलस पूरनची 34 चेंडूत केलेली 62 धावांची खेळी शार्दुल ठाकूरने संपवली. अखेर दिल्लीने हैदराबादला 20 षटकात 8 बाद 186 धावात रोखले आणि सामना 21 धावांनी जिंकला.
सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच षटकात धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने दिल्लीचा नवा सलामीवीर मनदीप सिंगला शुन्यावर बाद केले. त्यानंतर मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भागीदारी एबोटने तोडली. त्याने मार्शला 10 धावांवर बाद केले.
यानंतर आलेला कर्णधार ऋषभ पंत देखील 16 चेंडूत 27 धावांची भर घालून माघारी गेला. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर सेट झाला होता. त्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत रोव्हमन पॉवेल बरोबर चौथ्या विकेटसाठी 122 धावांची दमदार भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नरने आपल्या जुन्या फ्रेंचायजीविरूद्ध इर्षेने खेळ करत नाबाद 92 धावा ठोकल्या. तर रोव्हमन पॉवेलने देखील 35 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी करून दिल्लीला 20 षटकात 3 बाद 207 धावा उभारण्यास मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.