IPL 2022 Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad  esakal
IPL

GT vs SRH : उमरानचा तोफगोळ्याला तेवतिया-राशिदच्या तलवारबाजीने उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गुजरातच्या राशिद खान आणि राहुल तेवतियाने शेवटच्या दोन षटकात 35 धावा ठोकत हैदराबादचा विजयी घास हिसकावून घेतला. राशिद खानने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत हैदराबादचे 196 धावांचे आव्हान पार केले. हैदराबादकडून उमरान मलिकने 4 षटकात 25 धावा देत 5 विकेट घेतल्या. मात्र मार्को येनसेनने त्याच्या कष्टावर पाणी फेरले. अखेरच्या षटकात 25 धावा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राशिद-तेवतियाने सामना अणला जवळ

राहुल तेवतिया आणि राशिद खानने शेवटच्या षटकात 22 धावांची गरज असताना मार्को येनसेनला तीन षटकार ठोकत सामना 1 चेंडूत 3 धावा असा आणला. त्यानंतर राशिद खानने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकून दिला.

तेवतियाची फटकेबाजी, गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 22 धावांची गरज

140-5 : निम्मा गुजरात एकट्या उमरानने खाल्ला

उमरान मलिकने आपल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिनव मनोहरचा शुन्यावर त्रिफळा उडवत गुजरातचा निम्मा संघ एकट्यानेच उडवला. त्यामुळे गुजरातची अवस्था 5 बाद 140 धावा अशी झाली.

139-4 :उमरान मलिकने उडवली मिलरची दांडी 

गुजरातचा डाव सावरू पाहणाऱ्या मिलरसाठी उमरान मलिक किलर ठरला. त्याने मिलरचा 17 धावांवर त्रिफळा उडवला.

122-3 :उमरान मलिकने गुजरातचे कंबरडे मोडले

यंदाच्या हंगामात भलत्याच फॉर्ममध्ये असलेल्या उमरान मलिकने गुजरात टायटन्स विरूद्ध त्याने आपली तिसरी शिकार केली. त्याने 38 चेंडूत 68 धावांची खेळी करणाऱ्या वृद्धीमान साहाचा त्रिफळा उडवत गुजरातचा सेट फलंदाज माघारी धाडला.

साहाचे 'सही' अर्धशथक 

वृद्धीमान साहाने 28 चेंडूत अर्धशतक ठोकत गुजरातला मजबूत स्थितीत नेले.

85-2 : मिलकचा गुजरातला मोठा धक्का

उमरान मलिकने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पटेलला 10 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

69-1 : उमरान मलिकने जोडी फोडली

उमरान मलिकने गजरातची धोकादायक होऊ पाहणारी सलामी जोडी फोडली. त्याने शुभमन गिलचा 22 धावांवर त्रिफळा उडवला.

59-0 (6 Ov) : वृद्धीमानचा आक्रमक अवतार 

गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहाची अखेर बॅट तळवपली. हैदराबादचे 195 धावांचे मोठे आव्हान पार करताना गुजरातने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या. त्यात वृद्धीमान साहाच्या 18 चेंडूत केलेल्या 39 धावांचा मोठा वाटा आहे.

SRH 195/6 (20) : शशांकचा शेवटच्या षटकात धमाका 

शशांक सिंहने फर्ग्युसनच्या शेवटच्या षटकात शेवटच्या तीन चेंडूत तीन षटकार ठोकत हैदराबादला 195 धावांपर्यंत पोहचवले. शशांकने 6 चेंडूत 25 धावा ठोकल्या.

161-5 : हैदराबादचा निम्मा संघ माघारी 

यश दयालने अर्धशतक पूर्ण करणाऱ्या एडिन माक्ररमला 56 धावांवर बाद केले. यामुळे हैदराबादच्या धावगतीला ब्रेक लागला.

147-4 : मोहम्मद शामीने पुन्हा दिला हैदराबादला हादरा

निकोलस पूरनला मोहम्मद शामीने 3 धावांवर बाद करत मोक्याच्या क्षणी हैदराबादला मोठा धक्का दिला.

140-3 : अखेर अल्झारी जोसेफने जोडी फोडली. 

अभिषेक शर्मा आणि एडिन माक्ररमने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 भागीदारी रचली. त्यामुळे हैदराबादने 15 व्या षटकात 140 धावांचा टप्पा पार केला होता. अभिषेक शर्माने 42 चेंडूत 65 धावांची खेळी केली. मात्र अभिषेकला जोसेफने बाद करत ही जोडी फोडली.

सलामीवीर अभिषेक शर्माचे दमदार अर्धशतक

हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार अर्धशतक ठोकत हैदराबादला 12 व्या षटकात 112 धावांपर्यंत पोहचवले.

44-2 : राहुल त्रिपाठी बाद 

मोहम्मद शामीने पॉवर प्लेमध्येच हैदराबादला दुसरा धक्का दिला. त्याने 10 चेंडूत 16 धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठीला बाद केले.

26-1 : हैदाबादला पहिला धक्का

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला मोहम्मद शामीने 5 धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला.

सुंदर हैदराबादमध्ये परतला

सनराईजर्स हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. सचितच्या जागी दुखापतीतून सावरलेल्या वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आले आहे. गुजरातने आपले विनिंग कॉम्बिनेशन न बदलण्याचा निर्णय घेतला.

गुजरातने नाणेफेक जिंकली.

गुजरात टायटन्सने सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT