Tilak varma  Sakal
IPL

MI vs CSK : 'तिलक' यशाची व्हाया 'रैना' कहाणी; वाचा कसे बदलले आयुष्य

सकाळ डिजिटल टीम

Suresh Raina Inspired Tilak Varma : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील 19 वर्षीय तिलक वर्मा यंदाच्या हंगामात विशेष छाप सोडताना दिसतोय. त्याने आयपीएलमधील आपल्या दुसऱ्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करुन सर्वांचे लक्ष्य आपल्याकडे वेधलं. तिलक वर्माने (Tilkak Varma) याने यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या इशान किशनचा (Ishan Kishan) विक्रमही मोडित काढला. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) सर्वात कमी वयात अर्धशतकीचा रेकॉर्ड आता तिलक वर्माच्या नावे झालाय. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिलक वर्माच्या बहरादर कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्जच्या माजी स्टारचा मोलाचा वाटा आहे. खुद्द डावखुऱ्या युवा फलंदाज घडण्यामागे जी भूमिका बजावलीये ती म्हणजे मिस्टर आयपीएल स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाने.

खुद्द तिलक वर्माने एका मुलाखतीमध्ये रैनाचा उल्लेख केला आहे. 2014 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी मुंबईचा आजचा युवा स्टार सुरेश रैनाला भेटला होता. या भेटीनं त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 2014 च्या आयपीएल हंगामावेळी उप्पलच्या एचसीए स्टेडियमवर हैदराबादचे क्रिकेट कोच सलाम बायश किंवा एका 12 वर्षांच्या मुलाला भेटलो होतो, हे कदाचित रैनाला आठवत नसेल.

त्या वेळी नेमकं काय घडलं होतं

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याची तयारी करत होता. या दोन्ही संघातील सामन्याच्या आदल्या दिवशी 12 वर्षांचा एक मुलगा पाच मिनिटांसाठी सुरेश रैनाला (Suresh Raina) भेटला. त्याने रैनासोबत फोटोही काढला. ही भेट त्या मुलासाठी प्रेरणादायी ठरली. आज आठ वर्षांनी हा मुलका मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आपल्या फटकेबाजीनं सर्वांच्या नजरेत भरला आहे. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिलक वर्मा आहे.

बायश यांनी त्या जुन्या भेटीचा उजाळा देत तिलक वर्मा आणि रैनाची रंजक स्टोरी एका मुलाखतीमध्ये सांगितली. ते म्हणाले की, माझ्या मॅनेजर मित्राच्या मदतीने आम्ही सराव पाहण्यासाठी मैदानात गेलो होते. त्यावेळी तिलक वर्मा माझ्यासोबत होता. यावेळी तिलक वर्मा रैनाला बॅटिंग करताना नुसता बघतच राहिला होता. तो एकटक रैनाची फलंदाजी पाहत होता. रैनाचा सराव झाल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत फोटोही काढला. ही भेट तिलक वर्मासाठी अविस्मरणीय ठरली असवी. यावेळीच क्रिकेटर व्हायच हे त्यानं निश्चित केल असावं, असा किस्सा तिलक वर्माच्या कोचने शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT