रॉयल चॅलेजर्स बंगळुरु संघ अजूनही आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL Trophy) प्रतिक्षेत आहे. यंदाच्या हंगामात कॅप्टन्सी बदलासोबत संघाचे नशीब बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल. आरसीबीच्या ताफ्यात एक लकीचार्म चेहरा सामील झालाय. हा खेळाडू आतापर्यंत चार संघाकडून खेळला असून तो ज्या संघाकडून खेळलाय त्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे या खेळाडूचे लक फॅक्टर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा (Royal Challangers Banglore) जेतेपदाचा दुष्काळ संपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक वेळा जेतेपद पटकवण्याचा विक्रम हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावे आहे. त्यांनी तब्बल पाच वेळा ट्रॉफी उंचावली आहे. त्यांच्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्ज (Channai Super Kings) चार ट्रॉफीसह दुसऱ्या स्थानावर आहे. यावेळी दोन नवे संघ सहभागी झाले असून नवा गडी नव राज्य अस काही समीकरण दिसणार का हे बघावे लागेल. एक खेळाडू असा आहे ज्याने चार वेळा वेगवेगळ्या संघाकडून आयपीएलची ट्रॉफी हाती घेतली आहे. यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा भाग असलेल्या करन शर्मा याच्या नावे हा अनोखा विक्रम आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबी ने करन शर्माला 50 लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होते. पहिल्यांदा हा खेळाडू अनसोल्ड राहिला होता. शेवटी आरसीबीने त्याला बेस प्राईजसह आपल्या संघात सामील करुन घेतलं.
चार वेळा IPL चॅम्पियन संघाचा सदस्य राहिलाय करन शर्मा
करन शर्मा याची आयपीएलमधील कामगिरी फारशी उल्लेखनिय नाही. पण तो ज्या संघाकडून खेळलाय त्या संघाने ट्रॉफी जिंकल्या हा कमालीचा योगायोग पाहायला मिळालाय. 2016 मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. यावेळी हैदराबादने ट्रॉफी जिंकली होती. 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धा जिंकली. यावेळी तो या संघाचा भाग होता. 2018 आणि 2021 मध्ये करन शर्मा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य होता. या दोन्ही हंगामात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली होती.
करन शर्मामुळे आरसीबीच नशीब पलटणार?
आता करन शर्मा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग आहे. त्याचा आरसीबीलाही फायदा होणार का? आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जे जमलं नाही ती गोष्ट फाफ ड्युप्लेसीच्या कॅप्टन्सीमध्ये साध्य होणार का? हे पाहावे लागेल. आयपीएलच्या इतिहासात करन शर्माने 68 सामन्यात, 59 विकेट घेतल्या असून 317 धावा त्याच्या नावे जमा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.