मुंबई : राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटचा 24 धावांनी पराभव करत 16 गुणांची कमाई केली. राजस्थानने लखनौसमोर 179 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र लखनौला 20 षटकात 8 बाद 154 धावांपर्यंतच मजल मारली.
राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा, मॅकॉय आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फलंदाजीत लखनौकडून दीपक हुड्डाने झुंजार खेळी करत 59 धावा केल्या. तर राजस्थानकडून यशस्वी जैसवालने 41 तर देवदत्त पडिक्कल 39 धावा केल्या.
17 वे षटक टाकणाऱ्या मॅकॉयने होल्डर पाठोपाठ दुष्मंथा चमीराचा शुन्यावर त्रिफळा उडवत लखनौला सातवा धक्का दिला.
मॅकॉयने देखील होल्डरला 1 धावेवर पॅव्हिलयनचा रस्ता धरायला लावत लखनौच्या अडचणीत वाढ केली.
युझवेंद्र चहलने लखनौ सुपर जायंटला मोठा धक्का दिला. त्याने 39 चेंडूत 59 धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला बाद केले.
क्रुणाल पांड्या बाद झाल्यानंतर दीपक हुड्डाने आपले अर्धशतक पूर्ण केले.
अर्धशतकी भागीदारी रचून डाव सावरणाऱ्या हुड्डा - पांड्या जोडी आर. अश्विनने फोडली. त्याने 23 चेंडूत 25 धावा करणाऱ्या क्रुणाल पांड्याला बाद केले.
लखनौची 3 बाद 29 धावा अशी अवस्था झाली असताना दीपक हुड्डा आणि क्रुणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
प्रसिद्ध कृष्णाने लखनौ सुपर जायंटला मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार केएल राहुलला 10 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला.
राजस्थानच्या ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात क्विंटन डिकॉक आणि आयुष बदोनीला पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत लखनौला दोन धक्के दिले.
18 चेंडूत 39 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला रवी बिश्नोईने बाद केले.
सलामीवीर यशस्वी जैसवालने 29 चेंडूत 39 धावांची खेळी केली. मात्र अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच त्याला आयुष बदोनीने बाद केले.
जेनस होल्डरने दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचणाऱ्या यशस्वी जैसवाल आणि संजू सॅमसनची जोडी फोडली. त्याने संजू सॅमसनला 32 धावांवर बाद केले.
सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि कर्णधार संजू सॅमसनने राजस्थानचा डाव सावरत पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी मजल मारून दिली.
लखनौ सुपर जायंटचा वेगावान गोलंदाज आवेश खानने राजस्थानचा अव्वल फलंदाज जॉस बटलरचा त्रिफळा उडवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.