IPL 2022: आयपीएलच्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पंजाब किंग्जने 11 धावांनी पराभव केला. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील CSK संघाचा आठ सामन्यांमधला हा सहावा पराभव होता. संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रवास कठीण होत आहे. चेन्नईला कालच्या सामन्यात विजयची आशा होते. कारण फिनिशर एमएस धोनी (MS Dhoni) क्रीजवर शेवटच्या षटकापर्यंत उपस्थित होता. CSK ला शेवटच्या सहा चेंडूत 27 धावांची गरज होती. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंकने अखेरची षटक टाकण्याची जबाबदारी सहा वर्षांनंतर आयपीएलचा सामना खेळणाऱ्या ऋषी धवनला दिले.(MS Dhoni Big Finish)
एमएस धोनीने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर पहिला चेंडू सिक्स मारला. यानंतर धवनने दुसरा चेंडू वाईड फेकला. आता CSK 5 चेंडूत 20 धावा करायच्या होत्या. दुसरा चेंडू धवनने यॉर्कर टाकला ज्यावर धोनीला एकही धाव करता आली नाही. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात धोनी डीप मिडविकेटवर जॉनी बेअरस्टोच्या हाती झेलबाद झाला. शेवटच्या तीन चेंडूत २० धावा हव्या होत्या धोनी बाद झाल्यामुळे सीएसकेच्या आशा मावळले. चौथ्या चेंडूवर ड्वेन प्रिटोरियसने सिंगल घेत जडेजाला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर षटकार मारत पराभवाचे अंतर कमी करण्यात प्रयत्न केला.
पंजाब किंग्जने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 187 धावा केल्या. सलामीवीर शिखर धवनने ५९ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावां केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संघ 6 बाद 176 धावा करता आल्या. सीएसकेकडून अंबाती रायडूने 39 चेंडूत 78 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांना प्रत्येकी दोन विकेट घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.