Jasprit Bumrah | Virat Kohli | Parthiv Patel  Sakal
IPL

बुमराह-विराटची गोष्ट चाहत्यांना खटकली; पार्थिवनं ट्रोलर्संना दिलं असं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील स्पर्धेला सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आपापल्या संघासाठी जीव तोडून खेळत असताना मैदानाबाहेर क्रिकेट समीक्षकांचीही बॅटिंग सुरु झालीये. भारतीय संघातील माजी विकेट किपर बॅट्समन आणि सध्या समालोचक आणि क्रिकेट समीक्षकाच्या रुपात दिसणारा पार्थिव पटेल (Parthiv Patel) हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यासंदर्भातील एक किस्सा शेअर केला होता. 2014 मध्ये आरसीबीकडून खेळत असताना बुमराहला रॉयल चॅलेंजर्सच्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी विराटसोबत चर्चा केली होती. पण यावेळी विराटने ये बुमराह वुमराह क्या करेंग! असं उत्तर दिले होते, असा किस्सा पटेलनं शेअर केला होता.

पार्थिव पटेलची ही गोष्ट विराट कोहलीच्या चाहत्यांच्या मनाला लागली आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम असलेल्या गोलंदाजाबद्दल विराट असं वागणार नाही, अशीच काहीशी त्यांची भावना आहे. त्यामुळेच विराटचे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्थिव पटेलला ट्रोल करत आहेत. पार्थिवचे वक्तव्य हे न पटणारे आहे. यागोष्टीत किती खरे आहे ते देवालाच ठाऊक पण ड्रेसिंगरुममध्ये झालेल्या आपल्या सहकाऱ्यांतील गोष्टी शेअर करणं योग्य नाही. पार्थिवला हे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अस्मिता धोक्यात आणायची नसते, असा सल्लाही या नेटकऱ्याने दिला आहे. याशिवाय अन्य नेटकरी अपशब्दांत पार्थिव पटेलला ट्रोल करत आहेत.

पार्थिव पटेलनं यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत आपल्या वक्यव्याशी ठाम असल्याचे म्हटेल आहे. कडुलिंबाचे पान आणि सत्य हे नेहमीच कडू असते, अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलाय. पार्थिव पटेलनं एका मुलाखतीमध्ये बुमराहसंदर्भातील खास किस्सा शेअर केला होता. तो म्हणाला होता की, रणजी ट्रॉफीतील बुमराह सुरुवातीच्या 2-3 वर्षांत बुमराह काही खास गोलंदाजी करताना दिसले नाही.

2015 मध्ये तर त्याला अर्ध्या सीझनमधून घरी पाठवण्याचा विचार सुरु होता. पण त्याने हळूहळू आपल्या कामगिरीत सुधारणा केली. मुंबई इंडियन्सने दिलेल्या सपोर्टमुळे त्याच्या गोलंदाजीत धार आली. बुमराहने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली तीही विराट कोहलीची. त्यामुळे तो चर्चेतीही आला. बुमराह रणजीमध्ये पटेलच्या नेतृत्वाखाली खेळत होता. त्यामुळे त्याने बुमराह नावाचा एक चांगला गोलंदाज आहे, असे सांगत विराट कोहलीला त्याला संघात घेण्याचा सल्ला दिला होता. पण कोहलीने बोलणं मनाव घेतलं नाही, असे पार्थिव पटेलनं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT