IPL 2022 PBKS vs RCB  ESAKAL
IPL

PBKS vs RCB : आरसीबीचे येरे माझ्या मागल्या; मयांकच्या नेतृत्वात पंजाबचे बल्ले बल्ले

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 Punjab Kings vs Royal Challengers Bangalore : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या दिवशी डबल हेडरचा दुसरा सामना रोमहर्षक झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने पंजाब किंग्ज समोर 206 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबने 5 गडी राखून पार केले. पंजाबकडून शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी प्रत्येकी 43 धावांची खेळी केली. तर स्लॉग ओव्हरमध्ये ओडीन स्मिथ (8 बॉल 25 धावा) आणि शाहरूख खानने (20 चेंडूत 24 फटकेबाजी करत सामन्याचे चित्रच पालटले.

तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस 57 चेंडूत 88 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार विराट कोहलीने 41 धावा करून चांगली साथ दिली. तर दिनशे कार्तिकने 14 चेंडूत 32 धावा ठोकून आरसीबीला 205 धावांपर्यंत पोहचवले.

शाहरूख खानने चौकार मरात एक षटक आधीच संपवला सामना, पंजाबने आरसीबीचे 206 धावांचे मोठे आव्हान केले पार

शाहरूख खान आणि ओडिन स्मिथची तडाखेबाज फलंदाजी

156-5 : पंजाबला मोठा धक्का; लीम लव्हिंगस्टोरन 19 धावा करून माघारी

139-4 : अंडर 19 स्टार राज बवा भोपळाही न फोडता माघारी

139-3 : खिशरनंतर डाव सावरणारा राजपक्षेही 43 धावा करून बाद

118-2 : शिखर धवनचे अर्धशतक हुकले

पंजाबला आक्रमक सुरूवात करून देणाऱ्या शिखर धवनचे अर्धशतक हुकले. हर्षल पटेलेने त्याला 43 धावांवर बाद केले.

71-1 : हसरंगाने दिला पंजाबला पहिला धक्का; कर्णधार मयांक अग्रवाल बाद

पंजाबने देखील आरसीबीच्या 205 धावांचा पाठलाग करताना 71 धावांची सलामी दिली. मात्र हसरांगाने मयांकला 32 धावांवर बाद करत पंजाबला 8 व्या षटकात पहिला धक्का दिला.

आरसीबीच्या 205 धावांचा डोंगर सर करताना पंजाबने केली दमदार सुरूवात

दिनेश कार्तिकचा आक्रमक अवतार तर विराट कोहलीची नाबाद खेळी; आरसीबीने उभारल्या 205 धावा

168-2: फाफ ड्युप्लेसिसचे शतक राहिले अपूर्ण

फाफ ड्युप्लेसिसची झंजावाती 57 चेंडूत केलेली 88 धावांची खेळी अखेर अर्शदीप सिंगने संपवली.

102/1: आरसीबीचे शतक पार; नवा कर्णधार ड्युप्लेसिसची तुफानी खेळी सुरू

50-1 : आरसीबीच्या अर्धशतकानंतर पंजाबला पहिले यश

आरसीबीचे सलामीवीर फाफ ड्युप्लेसिस आणि अर्जुन रावत यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र त्यानंतर लगेचच राहुल चाहरने अर्जुन रावतला 21 धावांवर बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT