सामन्याच्या अखेरच्या षटकात तिसऱ्या चौथ्या चेंडूवर स्मिथने ओव्हर थ्रो केला आणि तेवतिया स्ट्राईकवर आला. तेवतियाने शेटच्या दोन चेंडूवर 12 धावांची गरज असताना दोन षटकार ठोकत सामना जिंकून दिला.
गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल अखेर 19 व्या षटाकत बाद झाला. त्याला रबाडाने 96 धावांवर बाद केले.
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातची धावगती थोडी मंदावली. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि गिलने आक्रमक फटके मारत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला.
राहुल चाहरने गुजरातची शतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला चहरने 35 धावांवर बाद केले.
गुजरातची सलामी जोडी शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी 32 धावांची सलामी दिली. मात्र सावध फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडला कसिगो रबाडाला 6 धावांवर बाद केले.
पंजाबचा स्टार हिटर शाहरूख खान आजच्या सामन्यात देखील फेल गेला. त्याला राशिद खानने 15 धावांवर बाद केले.
पंजाबचा लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावा ठोकल्या. मात्र राशिद खानने त्याला बाद करत पंजाबच्या धावगतीला ब्रेक लावला.
वर्ध्याच्या दर्शन नाळकंडेने पुढच्याच चेंडूवर एडेन स्मिथला बाद केले.
पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणारा जितेश शर्मा 13 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याला दर्शन नाळकंडेने बाद केले.
शिखर बाद झाल्यानंतर लिम लिव्हिंगस्टोनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 21 चेंडूत 50 धावा चोपल्या. त्याने पंजाबला 13 षटकात 14 धावांपर्यंत पोहचवले.
30 चेंडूत 35 धावा करत तिसऱ्या विकेटसाठी लिव्हिंगस्टोनबरोबर 48 धावांची भागीदारी रचणाऱ्या शिखर धवनला राशिद खानने बाद केले.
पॉवर प्लेमध्येच पंजाबचे दोन फलंदाज माघारी फिरल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि लिम लिव्हिंगस्टोन यांनी भागीदारी रचत डाव सावरला.
राजपक्षेच्या जारी संघात स्थान दिलेल्या जॉनी बेअरस्टोला फारशी कमाल दाखवता आली नाही. त्याला 8 धावांवर लोकी फर्ग्युसनने बाद केले.
पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 5 धावांवर बाद केले.
गुजरात टायटन्सनेही आपल्या संघात बदल केला असून विजय शंकरला डच्चू मिळाला आहे. गुजरातकडून दर्शन नालकांडे आणि साई सुदर्शन यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.
पंजाबने जॉनी बेअरस्टोला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले असून तो धावा करणाऱ्या राजपक्षेची जागा घेणार आहे.
मुंबई : दोन चेंडू दोन षटकार मारत राहुल तेवतियाने गेलेला सामना परत आणला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनी पराभव केला. राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर षटकार मरात सामना जिंकून दिला.
पंजाबचे विजयासाठीचे 190 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातने दमदार सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिलने पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत फटकेबाजी केली. त्याने मॅथ्यू वेड बरोबर 20 चेंडूत 32 धावांची सलामी दिली. त्यानंतर रबाडाने मॅथ्यू वेडला 6 धावांवर बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला.
मात्र त्यानंतर पदार्पण करणारा साई सुदर्शन बॅटिंग करण्यास आला. या डावखुऱ्या फलंदाजाने शुभमन गिलला चांगली साथ दिली. दरम्यान, गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने सुदर्शन देखील मिळालेला चेंडू सीमापार धाडत स्कोअरबोर्ड हलता ठेवत होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. मात्र राहुल चाहरने साई सुदर्शनला 35 धावांवर बाद करत गुजरातला दुसरा धक्का दिला. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातची धावगती थोडी मंदावली. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि गिलने आक्रमक फटके मारत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र त्यावेळी गुजरातला 6 चेंडूत 19 धावांची गरज होती. त्यात शुभमन गिल देखील 96 धावांवर बाद झाला होता. दरम्यान हार्दिक पांड्या 18 चेंडूत 27 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर गुजरातला ज्यावेळी 2 चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज होती त्यावेळी राहुल तेवतियाने षटकार मरात सामना 1 चेंडूत 6 धावा असा आणला. तेवतियाने अखेरच्या चेंडूवर देखील षटकार मारत गुजरातच्या विजयाची हॅट्ट्रिक केली.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाब किंग्जला पॉवर प्लेमध्येच धक्के देण्यास सुरूवात केली. त्यांनी मयांक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टोला स्वस्तात बाद केले. नवीन चेंडू टाकणाऱ्या हार्दिकने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये मयांक अग्रवाल सारखी मोठी विकेट काढून दिली. त्यानंतर हंगामातील पहिलाच सामना खेळणारा बेअरस्टोला लोकी फर्ग्युसनने बाद केले.
मात्र त्यानंतर शिखर धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमते असे वाटत असतानाच राशिद खानने शिखर धवनला (35) बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफान फटकेबाजी सुरू केली. यामुळे संघाचे शतक धावफलकावर लागले. मात्र दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज बेजबाबदार फटके मारून बाद होत होते. जितेश शर्मा आणि ओडिन स्मिथ पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाले. त्यांना पदार्पण करणाऱ्या दर्शन नाळकांडे बाद केले.
दरम्यान, पंजाबच्या बॅटिंगची जबाबदारी एकहाती सांभळलेला लिव्हिंगस्टोन देखील 64 धावांची खेळी करून बाद झाला. शाहरूख खानने देखील दोन षटकार मारून पुन्हा निराशा केली. गुजरातकडून राशिद खानने भेदक मारा करत 3 तर दर्शन नाळकांडेने 2 विकेट घेतल्या. अखेर राहुल चाहने 14 चेंडूत 22 धावांची खेळी करत पंजाबला 189 धावांपर्यंत पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.