इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या दुपारच्या सत्रातील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रविंद्र जडेजानं खास विक्रमाला गवसणी घातली. सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा या रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) आहेत. धोनीच्या जागी त्याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. पण त्याच्या कॅप्टन्सी इनिंगची सुरुवात खराब झालीये. चेन्नईने सुरुवातीचे तीन सामने गमावले आहेत.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच जडेजाने खास विक्रम आपल्या नावे केला. रविद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी 150 वा सामना खेळत आहे. चेन्नईकडून हा पल्ला गाठणारा तो तिसरा खेळाडू ठरलाय. याआधी महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने हा पल्ला पार केला होता.
चेन्नई सुपर किंग्जकडून रविंद्र जडेजाने 150 सामने खेळले असून त्याच्या खात्यात 1523 धावांसह विकेट 110 विकेट आणि 69 कॅचचा समावेश आहे. सीएसकेकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे आहे. त्याने 217 सामने खेळले आहेत. सुरेश रैनाने 200 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व केले आहे. ड्वेन ब्रावो 123 आणि आर अश्विन 121 सामन्यात चेन्नईचे प्रतिनिधीत्व केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.