IPL 2022 Mumbai Indians  Sakal
IPL

IPL Records : पहिला सामना देवाला, सलग 10 व्या सीझनमध्ये पराभव, पण..

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 Record : आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सलामीच्या लढतीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्यांना पराभूत केले. ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या 75 धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने मुंबईला पराभवाचा दणका दिला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 ट्रॉफ्या जिंकल्या आहेत. आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्याची ही पहिली वेळ नाही. 2013 पासून आतापर्यंत प्रत्येक हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सनं गमावला आहे. पण यात विशेष म्हणजे मुंबईने सुरुवातीच्या पराभवातून सावरत दमदार कमबॅकही करुन सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवण्याचा विक्रम करुन दाखवला आहे. पहिला सामना देवाला असाच काहीतरी विचार मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर घोळत असेल.

2013 मध्ये मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दोन धावांनी पराभूत केले होते. या हंगामात मुंबई इंडियन्सने दमदार कमबॅक करत चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत पहिली वहिली ट्रॉफी उंचावली होती. 2015 मध्ये कोलाकाता नाईट रायडर्सनं मुंबईला 7 विकेट्सने पराभूत केले होते. या हंगामातही मुंबई फायनलमध्ये पोहचली आणि पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जला धोबी पछाड देत त्यांनी दुसरी ट्रॉफी जिंकली. 2017 च्या हंगामात पुणे सुपर जाएंट्स संघाने सलामीच्या लढतीत मुंबईला 7 विकेट्सनी पराभूत केले. या हंगामात फायनलमध्ये मुंबईने याचा हिशोब चुकता केला. रंगतदार झालेल्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याला 1 धावांनी पराभूत करत तिसरी ट्रॉफी जिंकली होती.

2019 च्या हंगामातील वानखेडेच्या मैदानात पहिला सामना खेळताना मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून 37 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळीही मुंबई इंडियन्सने दिमाखदार कमबॅक करत फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला नमवत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली होती. 2020 च्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला मात दिली होती. या हंगामातही मुंबई इंडियन्सने फायनल जिंकली होती. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT