IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धेची सुरुवात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या लढतीनं करणार आहे. सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा हुकमी दिसणार नाही. सुर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) हा दुखापतग्रस्त असून तो खेळणार की नाही याबाबत खुद्द कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) संभ्रमात आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात 31 वर्षीय सुर्यकुमार यादव याला अंगठ्याला दुखापत झाली होती. यातून तो अद्यापही सावरलेला दिसत नाही. 22 फेब्रुवारीला झालेल्या दुखापतीनंतर सुर्यकुमार यादव बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) रिहॅबिटेशनमध्ये पोहचल्याचे पाहायला मिळाले होते.
बुधवारी 23 मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये MI चा कर्णधार रोहित शर्माला यासंदर्भातच प्रश्न विचारण्यात आला होता. सुर्यकुमार यादव सुरुवातीच्या सामन्याला उपलब्ध असेल, का? असे रोहितला विचारण्यात आले होते. यावर रोहित म्हणाला की, सुर्यकुमार यादव अजूनही बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच आहे. आयपीएल खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतरच तो संघाला जॉईन होईल.
रोहित म्हणाला की, ''सूर्या अजूनही एनसीएतच आहे. तो दुखापतीतून सावरत आहे. पण तो सलामीच्या लढतीला उपलब्ध राहिल का हे मी आता सांगू शकत नाही. तो लवकरात लवकर संघात सामील व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, असेही रोहित शर्माने सांगितले. यंदाच्या हंगामासाठी मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या यांना रिलीज करत सुर्यकुमार यादव याच्यावर विश्वास दाखवला होता. रोहित शर्मा आणि बुमरासह मुंबईने त्याला रिलीज केले होते. या तिघांशिवाय केरॉन पोलार्डलाही मुंबईने आपल्या संघात कायम ठेवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.