IPL 2022, Mumbai Indians Squad Mumbai Indians Twitter
IPL

IPL 2022 MI Squad 2022 : आधी विक्रम; शेवटी लंगड्या घोड्यावर डाव!

सुशांत जाधव

IPL 2022, Mumbai Indians Squad : आयपीएलच्या सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ लिलावातही दमदार रणनिती आखण्यात तरबेज मानला जातो. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांची रणनिती कुठतरी फसल्याचे दिसते. क्विंटन डिकॉकला घेऊ का नको ...करत त्यांनी सोडले. ट्रेंड बोल्टबाबतही तोच कित्ता गिरवला. दुसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या रुपात त्यांनी बोल्टची उणीव भरुन काढण्यासाठी मोठी रक्कम मोजली. पण जोफ्रा दुखापतीमुळे खेळेल का नाही? याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा सौदा घाट्याचा ठरणार की फायद्याचा ते येणारा काळच ठरवेल. (IPL 2022 Rohit Sharma Mumbai Indians Squad After IPL Mega Auction)

पहिल्या दिवशी त्यांनी इशान किशनवर लावलेली बोली विक्रमी ठरली. युवा यष्टीरक्षकासाठी त्यांनी क्विंटन डिकॉकला सोडले. मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात युवांनाही बऱ्या पैकी संधी दिलीये. दक्षिण आफ्रिकेच्या अनकॅप्ड प्लेयरसाठी त्यांनी कोट्यवधी मोजले. लिलावाआधी त्यांनी चार खेळाडू रिटेन केले होते. यात केरॉन पोलार्डसह 8 परदेशी खेळाडू आणि 21 देशी खेळाडूंसह त्यांनी नवी मोट बांधली आहे.

Mumbai Indians चे रिटेनर

मुंबई इंडियन्सचे रिटेनर

रोहित शर्मा (16 कोटी)

जसप्रित बुमराह (12 कोटी)

सुर्यकुमार यादव (8 कोटी)

केरॉन पोलार्ड (6 कोटी)

मुंबई इंडियन्सनं लिलावात कुणाला किती देऊन खरेदी केलं

इशान किशन (Ishan Kishan) Indian Wicket Keeper ₹15,25,00,000

डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) Overseas Batsman ₹3,00,00,000

अनमोलप्रीत सिंग (Anmolpreet Singh) Indian Batsman ₹20,00,000

बासिल थंपी (Basil Thampi) Indian Bowler ₹30,00,000

मुर्गन अश्विन (Murugan Ashwin) Indian Bowler ₹1,60,00,000

जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) Indian Bowler ₹1,30,00,000

मयांक मार्केंडे (Mayank Markande) Indian Bowler ₹65,00,000

एन तिलक वर्मा (N. Tilak Varma) Indian All-Rounder₹1,70,00,000

संजय यादव (Sanjay Yadav) Indian All-Rounder ₹50,00,000

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) Overseas All-Rounder ₹8,00,00,000

डेनियल सॅम्स (Daniel Sams) Overseas All-Rounder ₹2,60,00,000

टायमल मिल्स (Tymal Mills) Overseas Bowler ₹1,50,00,000

टीम डेविड (Tim David) Overseas All-Rounder ₹8,25,00,000

रमणदीप सिंग (Ramandeep Singh) Indian All-Rounder ₹20,00,000

आर्यन जुयाल (Aryan Juyal) Indian Wicket Keeper ₹20,00,000

फॅबिन एलन (Fabian Allen) Overseas All-Rounder ₹75,00,000

रिले मेरेडिथ (Riley Meredith) Overseas Bowler ₹1,00,00,000

राहुल बुद्धी (Rahul Buddhi) Indian Batsman ₹20,00,000

ऋतिक शोकीन (Hrithik Shokeen) Indian All-Rounder ₹20,00,000

मोहम्मद अर्शद खान (Mohd. Arshad Khan) Indian All-Rounder ₹20,00,000

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) Indian All-Rounder ₹30,00,000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT