पुणे : रॉयल चॅलेंजर बेंगलोरला राजस्थान रॉयल्सने ठेवलेले 145 धावांचे माफक आव्हान पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 115 धावात माघारी गेला. राजस्थानने सामना 29 धावांनी जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचली. राजस्थानकडून कुलदीप सेन आणि आर. अश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत राजस्थानकडून रियान परागने झुंजार खेळ करत 56 धावांची खेळी केली. आरसीबीकडून कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक 23 धावा केल्या.
अश्विनने शाहबाज अहमदला आणि कुलदीपने वानिंदू हसरंगाला बाद करत आरसीबीचे तगडे फलंदाज माघारी धाडले.
रजत पाटीदारचा त्रिफला उडवल्यानंतर अश्विनने सुयश प्रभदेसाईला देखील 2 धावांवर बाद करत राजस्थानची अवस्था 5 बाद 66 अशी केली.
वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने ड्युप्लेसिस पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलला देखील बाद करत आरसीबीला सलग दोन मोठे धक्के दिले. मॅक्सवेल गोल्डन डकवर बाद झाला.
विराट कोहली बाद झाल्यानंंतर ड्युप्लेसिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 21 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. मात्र कुलदीप सेनच्या वेगाने त्याला चकवले. आणि तो झेलबाद झाला.
गेल्या दोन सामन्यात गोल्डन डकवर बाद झालेला विराट काहली आज सलामी देण्यासाठी आला. मात्र त्याचा खराब फॉर्म सलामीला देखील कायम राहिला. तो पहिल्या चेंडूपासूनच चाचपडत खेळत होता. अखेर प्रसिद्ध कृष्णाने त्याला 9 धावांवर बाद करत त्याची धावा करण्याची धडपड संपवली.
राजस्थानचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात असताना रियान परागने एक बाजू लावून धरली त्याने शेवटच्या दोन षटकात आक्रमक फटकेबाजी करत 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 31 चेंडूत केलेल्या 56 धावांमुळे राजस्थानला 144 धावांपर्यंत पोहचवले.
हर्षल पटेलने ट्रेंट बोल्टला 5 धावांवर बाद करत राजस्थानला सातवा धक्का दिला. विराट कोहलीने बोल्टचा जबरदस्त कॅच घेतला.
आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने राजस्थानला अजून एक मोठा धक्का दिला. त्याने आक्रमक शैलीच्या शिमरॉन हेटमायरला 3 धावांवर बाद केले.
जॉश हेडलवूडने डॅरेल मिशेलला 16 धावांवर बाद करत राजस्थानला पाचवा धक्का दिला. मिशेलने 16 धावा करण्यासाठी 27 चेंडू घेतले.
जॉस बटलर बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला हसरंगाने बाद कलेे. संजूने 21 चेंडूत 27 धावांची खेळी केली.
अश्विन बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉस हेजलवूडने राजस्थानचे रन मशिन जॉस बटलरला बाद केले. बटलरने 9 चेंडूत 8 धावा केल्या.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आर. अश्विनला मोहम्मद सिराजने बाद केले. अश्विने 9 चेंडूत 17 धावा केल्या.
मोहम्मद सिराजने राजस्थानला पहिला धक्का दिला. त्याने देवदत्त पडिक्कलला 7 धावांवर बाद केले. पडिक्कल बाद झाल्यानंतर राजस्थानने आर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले.
आरसीबीचा अनुज रावत बाहेर रजत पाटीदार आत. तर राजस्थानचे करूण नायर आणि मॅकॉय बाहेर तर कुलदीप सेन आणि डॅरेल मिचले आत
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.