IPL 2022 Shikhar Dhawan Preity Zinta Punjab Kings Captain Sakal
IPL

IPL 2022 : शिखर धवन होणार प्रितीच्या संघाचा 'किंग'

सुशांत जाधव

आयपीएलच्या आगामी हंगामात भारताचा अनुभवी सलामीवीर कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसू शकतो. आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज संघानं (Indian Premier League franchise Punjab Kings) मेगा लिलावात शिखर धवनला 8.25 कोटी मोजून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होते. हो धवन आमच्यात आला. त्याला संघात घेण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्नशील होतो, अशा शब्दांत PBKS च्या मालकीण प्रिती झिंटा (Preity Zinta) हिने धवनच वेलकम केले आहे. (IPL 2022 Shikhar Dhawan Set to be Named Punjab Kings Captain Report)

गत हंगामा लोकेश राहुल (KL Rahul) पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. मात्र या हंगामानंतर त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर पंजाबचा पुढचा कर्णधार कोण अशी चर्चा रंगली होती. पंजाबने मयांक अग्रवालला 12 कोटी मोजून रिटेन केलं आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत त्याने अनेक सामन्यात कर्णधारपदाची धूराही सांभाळली आहे. पण अनुभवाच्या जोरावर 8 कोटीचा धवन 12 कोटीच्या गड्यावर भारी पडणार असल्याचे दिसते. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, शिखर धवनला कर्णधार करायचं हे पंजाबनं पक्क ठरवलं आहे. आता त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. होणार

शिखर धवन याने (Shikhar Dhawan) दिल्ली कॅपिटल्सकडून दमदार कामगिरी केली होती. 2019 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात जॉईन झाला. दिल्लीकडून खेळताना तिन्ही हंगामात त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. धवनने दिल्लीकडून खेळलेल्या मागील तीन हंगामात 1726 धावा कुटल्या आहेत.

PBKS संघाने धवनशिवाय इंग्लंड ऑल राउंडर लायम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याच्यासाठी 11.5 कोटी मोजले. तो यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. याशिवाय कागिसो रबाडा (Kagiso Rabada), जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), शाहरुख खान (Shahrukh Khan), राहुल चहर (Rahul Chahar) या मंडळींना पंजाबने आपल्या ताफ्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT