मुंबई : पंजाब किंग्जने सनराईजर्स हैदराबादचे 158 धावांचे आव्हान 15.1 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार करत यंदाच्या आयपीएल हंगामातील आपला शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. तर शिखर धवनने 39 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून फझलहक फारूकीने 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने 43 तर वॉशिंग्टन सुंदरने 25 आणि रोमरियो शेफर्डने नाबाद 26 धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
लिम लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत 49 धावांची खेळी करत पंजाबला 16 व्या षटकातच सामना जिंकून दिला.
जगजीशा सुचितने 7 चेंडूत आक्रमक 19 धावा करणाऱ्या जितेश शर्माला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला.
पंजाब किंग्जचा डाव सारवून धरणाऱ्या शिखर धवनने 32 चेंडूत 39 धावांची खेळी केली. मात्र ही खेळी फारूकीने 13 व्या षटकात संपवली.
पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 1 धावेवर बाद करत मोठा धक्का दिला.
पंजाबचा आक्रमक फलंदाज शाहरूख खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला 19 धावांवर उमरान मलिकने बाद केले.
हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो 23 धावा करून बाद झाला. त्याला फझलहक फारूकीने बाद केले.
हैदराबादचा निम्मा संघ शंभरच्या आत माघारी गेल्यानंतर रोमारियो शेफर्ड आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी रचत हैदराबादला दीडशतकी मजल मारून दिली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची भागीदारी रचली. यामुळे हैदराबादने 20 षटकात 7 बाद 156 धावांपर्यंत मजल मारली. रोमारियो शेफर्डने 15 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 19 चेंडूत 25 धावा केल्या.
हरप्रीत ब्रारने आपली तिसरी शिकार करत अॅडिन माक्ररमला 21 धावांवर बाद केले. डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीतने हैदराबादच्या पहिल्या पाच पैकी तीन फलंदाजांना बाद केले.
एलिसने धोकादायक फलंदाज निकोलस पूरनला 5 धावांवर बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला.
हरप्रीत ब्रारने अभिषेक शर्माला 43 धावांवर बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. अभिषेकचे अर्धशतक 7 धावांनी हुकले.
सनराईजर्स हैदराबादचा फॉर्ममध्ये असलेल्या राहुल त्रिपाठीला हरप्रीत ब्रारने 20 धावांवर बाद करत हैदराबादचा दुसरा फलंदाज माघारी धाडला.
पंजाबच्या कसिगो रबाडाने प्रियम गर्गला 4 धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला.
सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.