IPL 2022 : टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सच्या दारुण पराभवानंतर त्याच्या जखमांवर मीठ चोळले आहे. सामन्यात पॅट कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावांची तुफानी खेळी करत मुंबई इंडियन्सला एकहाती खिंडार पाडले. मुंबई इंडियन्सविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळताना पॅट कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. पॅट कमिन्सने या प्रकरणात केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (MI vs KKR Match News)
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सामन्यात एका क्षणी पराभवाच्या उंबरठ्यावर होता. मात्र पॅट कमिन्सने संपूर्ण सामना सामना पालटवला. पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर जखमेवर मीठ शिंपडणारे ट्विट केले आहे. सेहवागने ट्विटरवर लिहिलं की, "तोंडातून घास हिसकावून घेतला, माफ करा वडापाव हिसकावून घेतला." असं खोचक ट्वीट केलं होत. (Virender Sehwag Tweet)
सेहवागने मुंबईच्या आवडत्या स्नॅक्स 'वडा पाव'चा संदर्भ घेतला आणि म्हटले की हे मुंबईच्या खेळाडूंकडून वडा पाव हिसकावण्यासारखे आहे. सेहवागच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर रोहीतच्या चाहत्यांनी सेहवागवर टीका केली होती. त्यानंतर सेहवागने परत त्या ट्वीटचं स्पष्टीकरण देत हे ट्वीट मुंबई शहरासाठी असल्याचं म्हटलंय. ज्या शहराची भूक वडापाव भागवतो असा या पदार्थाचा संदर्भ मुंबईसाठी घेतला असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. तसंच "रोहितच्या चाहत्यांनो जरा थंड घ्या. मी रोहितच्या फलंदाजीचा आणि त्यापेक्षा जास्त तुमचा फॅन आहे." असं ट्वीट देखील केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.