CSK-Team 
IPL

IPL 2023 : धोनीच्या चेन्नईला प्लेऑफआधी मोठा धक्का! दिग्गज ऑलराऊंडर IPL मधून बाहेर

रोहित कणसे

Ben Stokes Leaves CSK Camp : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धचा शेवटचा लीग सामना 77 धावांनी जिंकला. या विजयासह चेन्नईने 17 गुणांसह प्लेऑफमध्येही आपले स्थान निश्चित केले आहे. आता संघ 23 मे रोजी पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दरम्यान या महत्वाच्या प्लेऑफ सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.

लीग स्टेजचा सामना संपल्यानंतर बेन स्टोक्स आता आपल्या देशात इंग्लंडला रवाना झाला आहे. स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले होते. स्टोक्सला फक्त 2 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने एकूण 15 धावा केल्या. याशिवाय स्टोक्सने 1 षटक टाकले आणि 18 धावा दिल्या.

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात 1 जूनपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. या कसोटी सामन्यासाठी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी स्टोक्सने परत जाण्याचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सच्या जाण्याबाबत, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करून ही माहिती दिली.

बेन स्टोक्स मायदेशी परतल्याने चेन्नई सुपर किंग्जला त्याची फारशी उणीव भासणार नाही. कारण चेन्नईचा संघ गेल्या 4 लीग टप्प्यातील सामन्यांमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे. आता क्वालिफायर-1 मध्येही CSK संघात काही बदल करेल अशी आशा कमी आहे. आयपीएलच्या या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT