ipl 2023 chennai super kings vs lsg ms dhoni-statement-after-match-regarding-bowlers-no-ball-wides  
IPL

IPL 2023 : "गोलंदाजांना ही दुसरी वार्निंग त्यानंतर मी…" विजयानंतर MS धोनी खेळाडूंवर भडकला

गोलंदाजांना दिली कर्णधारपद सोडण्याची धमकी अता...

Kiran Mahanavar

IPL 2023 MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2023 चा सहावा सामना CSK च्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळला गेला. चेन्नईने हा रोमांचक सामना अवघ्या 12 धावांनी जिंकला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली.

चेन्नईचे शेर आणि लखनौचे नवाब यांच्यात अप्रतिम असा सामना पाहायला मिळाला. पण शेवटी महेंद्रसिंग धोनीच्या संघाचा विजय झाला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर माहीही त्याच्या गोलंदाजांबद्दल खूप निराश झाला.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर सामन्यादरम्यान सीएसकेने वाइड आणि नो बॉलसह अनेक अतिरिक्त धावा दिल्या. माहीला हे अजिबात आवडले नाही. अशा परिस्थितीत तो सामन्यानंतर म्हणाला, 'त्याला नो बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड बॉल टाकणे टाळावे लागेल. अन्यथा त्याला नव्या कर्णधाराखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरी वार्निंग असेल नाहीतर मग मी निघून जाईन.

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले, चेन्नईने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 217 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड (57), डेव्हॉन कॉनवे (47) यांनी ही धावसंख्या गाठण्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रत्युत्तरात लखनौनेही फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. धक्कडचा सलामीवीर काईल मायर्सने दुसऱ्या सामन्यातही झटपट अर्धशतक केले. त्याचवेळी निकोलस पूरननेही जलद 32 धावा केल्या. पण ते लक्ष्य 12 धावांनी चुकले आणि सामना गमावला. चेन्नईचा या मोसमातील हा पहिला विजय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT