IPL 2023 csk coach stephen fleming statement on injured players of team ipl 2023 csk vs rr 
IPL

IPL 2023 : शांत फ्लेंमिंगनं पराभवानंतर काढला जाळ! असं काही बोलला की खळबळच उडाली

रोहित कणसे

आयपीएल 2023 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक थ्रीलिंग सामना पाहायला मिळाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा त्याच्याच घरात 3 धावांनी पराभव केला.

या मॅचमध्ये धोनीने शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली असली तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या पराभवानंतर संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग एका गोष्टीने चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळालं.

पराभवानंतर प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य

चेन्नई सुपर किंग्जला राजस्थान रॉयल्सकडून 3 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठे विधान केले आहे. चेन्नई संघात खेळाडूंना सतत दुखापत होत असल्याबद्दल त्याने चिंता व्यक्त केली आहे. पराभवानंतर धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे काहीसा अडचणीत असल्याचं आढळून आलं. याबाबत फ्लेमिंगने सांगितले की, धोनीची फिटनेस नेहमीच चांगली राहिला आहे, मात्र आता दुखापतीमुळे त्याला थोडा त्रास जाणवत आहे.

खेळाडूंबद्दल काय म्हणाले फ्लेमिंग

चेन्नई सुपर किंग्जची वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाही जखमी होऊन राजस्थानविरुद्ध मैदानाबाहेर गेला. त्याने फक्त दोन षटके टाकली. याबाबतही प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाले की, दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत आम्हाला आधीच काळजी वाटत आहे. अशा परिस्थितीत या यादीत आणखी खेळाडूंचा समावेश होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. फ्लेमिंग पुढे म्हणाले की, श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पाथिराना आता कोरोनामधून बरा झाला आहे आणि आता संघात निवडीसाठी उपलब्ध आहे.

मॅचमध्ये काय झालं?

इंडियन प्रीमियर लीग (IPL-2023)मध्ये माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्सने बुधवारी चेन्नई सुपर किंग्जवर 3 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. पहिल्यांदा फलंदाजीचे करत राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावाच करू शकला. यासोबतच राजस्थानला आयपीएलच्या या मोसमातील तिसरा विजय मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT