Runner up CSK picture goes viral sakal
IPL

IPL 2023 Final: सामन्याच्या आधीच केली उपविजेत्याची घोषणा? वादाला तोंड फोडणारा फोटो व्हायरल

संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही झाले नाही आणि स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले त्यानंतर...

Kiran Mahanavar

CSK vs GT IPL 2023 Final : आयपीएल 2023 चा विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या जात आहे. 16व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (28 मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे.

संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान स्टेडियमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे आयपीएल चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नवीन वादाला तोंड फुटले आहे. (Runner up CSK picture goes viral)

व्हायरल फोटो स्टेडियममध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनचा आहे, ज्यावर 'रनरअप चेन्नई सुपर किंग्स' असे लिहिले आहे. हा फोटो समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक जण बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काहींनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, "फायनल आधीच ठरली आहे कारण CSK उपविजेते आहे.

विशेष म्हणजे, चेन्नईने आयपीएल 2022 मध्ये निराशाजनक कामगिरी केली आणि नवव्या स्थानावर राहिली. पण सीएसकेने 16व्या हंगामात आश्चर्यकारक कामगिरी केली आणि अंतिम फेरीत पहिला प्रवेश केला. जर सीएसकेने जीटीवर मात केली तर मुंबई सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत बरोबरी करेल. 5 ट्रॉफी जिंकणारा मुंबई हा सध्या एकमेव संघ आहे.

दुसरीकडे, गुजरातने फायनल जिंकल्यास विजेतेपद राखणारा तिसरा संघ ठरेल. त्याआधी चेन्नई आणि मुंबईने हा पराक्रम केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT