CSK vs GT IPL Final 2023 
IPL

CSK vs GT IPL Final 2023 : अहमदाबादमध्ये पाऊस झाला सुरू! सामना रद्द झाल्यावर कोण होणार चॅम्पियन ?

Kiran Mahanavar

CSK vs GT IPL Final 2023 : आज आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघ चेन्नई सुपर किंग्ससमोर आहे. जिथे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK आपले 5 वे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याचा गुजरात संघ सलग दुसरा फायनल खेळत आहे.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळल्या जात आहे. सध्या आयपीएलमध्येही पावसाने काही सामन्यांमध्ये व्यत्यय आणला आहे, तर आज फायनलमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे.

गुजरात आणि चेन्नई यांच्यातील अंतिम सामन्यात पाऊस सुरू झाला आहे. या सामन्याचा नाणेफेक 7 वाजता होणार होते तर पहिला चेंडू 7.30 वाजता टाकला जाणार होता. पण नाणेफेकीच्या वेळी पाऊस आला त्यामुळे थोडे उशिरा होणार आहे.

अहमदाबादमध्ये 7 वाजल्यापासूनच पावसाची 49 टक्के शक्यता आहे. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत पावसाची 64 टक्के शक्यता आहे. यानंतर सकाळी 10 वाजता 29 टक्के आणि 11 वाजता 24 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सामना सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्या डावानंतर पावसाने व्यत्यय आणल्यास डकवर्थ लुईस (DLS) चे परिणाम होऊ शकतात. जर पहिला चेंडू टाकता आला नाही तर जास्तीत जास्त वेळ वाट पाहिली जायची आणि एक षटकाचा सामना 12.50 पर्यंत केला जाऊ शकतो. पाच षटकांचा सामनाही होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघ सुपर ओव्हर खेळतील आणि सुपर ओव्हरमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल हे ठरविले जाईल. विजेत्या संघाचे निर्धारण करण्यासाठी उपलब्ध वेळेत परिस्थिती सुपर ओव्हरला परवानगी देत ​​नसेल, तर साखळी फेरीत गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला संघ विजेता मानला जाईल. साखळी फेरीअखेर गुजरात २० गुणांसह अव्वल, तर चेन्नई १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. पावसामुळे सामना झाला नाही तर गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन होईल.

आयपीएल 2022 मध्ये फायनलसाठी राखीव दिवस होता, परंतु बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्लेऑफ वेळापत्रकानुसार यंदा आयपीएल 2023 फायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे, IPL 2023 चा अंतिम विजेता ठरलेल्या सामन्याच्या दिवशीच (रविवार, 28 मे) ठरवला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT