Shubhaman Gill 
IPL

IPL 2023: "गिलला जंगल आवडत नाही"; शुभमनच्या तडाखेबाज खेळीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बीसीसीआयनं नुकताच आणलेला एक नियम आणि शुभमनची खेळी यावरुन नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघात सामना होत आहे. यामध्ये गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करत मुंबईसमोर दमदार २३४चं टार्गेट ठेवलं.

यामध्ये सलामीवीर शुभमन गिलच्या तडाखेबाज खेळीचा समावेश आहे. गिलनं ४९ चेंडूंमध्ये शतक ठोकलं. त्यानं जवळपास सर्वच चेंडू खेळून काढले. त्याच्या या खेळीमुळं नेटकरी मात्र भलतेच पेटले होते.

बीसीसीआयनं नुकत्याच आणलेल्या एका नियमावरुन गिललं जंगल आवडत नाही, अशी भन्नाट कमेंट एका नेटकऱ्यानं दिली आहे. (IPL 2023 Gill doesnt like jungle Netizens amazing reactions to Shubman Gill brilliant innings)

बीसीसीआय आणि टाटानं मिळून प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये प्रत्येक डॉट बॉलसाठी ५०० झाडं लावण्याचा नियम जाहीर केला. त्यामुळेच प्ले ऑफच्या सामन्यात एखाद्या गोलंदाजाने डॉट बॉल टाकला की त्या ठिकाणी झाडाचे चित्र दिसत आहे. पण आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना अशा डॉट बॉल टाकण्याची संधी शुममननं दिलीच नाही. त्यानं जवळपास प्रत्येक चेंडू टोलवण्याचीच कामगिरी केली.

यामुळेच शुभमनची धडाकेबाज खेळी पाहताना त्याचे चाहते आणि नेटकरी भलतेच चेकाळत होते. अनेकांनी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एकानं अशाच प्रकारे कमेंट केली आहे. "BCCI और TATA ने मिलकर हर एक डॉट बॉल पर 500 पौदे लगाने का संकल्प लिया था. लेकिन लगता है गिल को जंगल पसंद नही है।" अशी कमेंट एकानं केली आहे.

शुभमन गिल एकटाच भिडला!

गुजरात टायटन्सचे शतक 12व्या षटकात धाव फलकावर लावल्यानंतर शुभमन गिलने आपल्या इनिंगचा 5 वा गिअर टाकला. त्यानं गेल्या सामन्यातील स्टार आकाश माधवाल, अनुभवी पियुष चावला यांचा खरपूस समाचार घेत षटकारांची बरसात केली. दुसऱ्याच षटकात 21 आणि 13 व्या षटकात 20 धावा चोपत संघाला 15 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवलं. शुभमन गिलनं 49 चेंडूत आपलं शतक पूर्ण करत हंगामातील तिसरे शतकही ठोकलं. यामध्ये 8 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT