ipl 2023 kkr purchase jason roy england batter jason roy join kkr in 2.8 crore rupees 
IPL

IPL 2023 : केकेआरची मोठी खेळी! 2.8 कोटी देऊन खरेदी केला इंग्लडचा 'हा' धाकड खेळाडू

रोहित कणसे

यंदाच्या आयपीएल सीझनला दुखापतींचे ग्रहन लागले आहे, यादरम्यान आयपीएल २०२३ मध्ये लागोपाठ दोन बडे खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्यानंतर अखेर कोलकाता नाइट रायडर्सने इंग्लडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय याला संघात सामील केले आहे.

केकेआरने जेसन रॉयला २.८ कोटी रुपये देऊन खरेदी केले आहे. त्याची बेस प्राइज १.५ कोटी रुपये होती. डावखुरा फलंदाज असलेला रॉय लवकरच केकेआरच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

महत्वाचे म्हणजे जेसन रॉय डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. कोणत्याही फ्रेंचायजीने त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता.

याआधी २०२२ सीजनसाठी झालेल्या ऑक्शनमध्ये गुजरात टाइटन्सनी त्याला २ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. पण बायो-बबलमुळे त्याला खेळण्यास मनाई करण्यात आली . आता तब्बल दोन वर्षांनंतर जेसन रॉय आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जेसन रॉय पहिल्यांदा आयपीएलमध्ये २०१७ मध्ये खेळला होता. २०१७ साली त्याने ३ सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने ५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१८ साली दिल्ली कॅपिटल्ससाठी तर २०२१ मध्ये सनरायजर्स हैद्राबाद साठी खेळला होता.

जेसन रॉय आयपीएलचे एकूण १३ सामने खळला आहे. त्याने यामध्ये २९.९० च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये जेसन रॉयने २ हाफ सेंच्युरी केल्या आहेत, तर त्याचा सर्वोच्च स्कोर ९१ आहे.

जेसन रॉयला कोलकता नाइट रायडर्स मधून श्रेयस अय्यर आणि शकिब अल हसन हे दोघे संघाबाहेर गेल्यानंतर सामील करण्यात आलं आहे. इंग्लडचा हा खेळाडू फलंदाजीसोबतच गोलंदाजी देखील करतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जेसन रॉयच्या नावावर १४ विकेट्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT