IPL 2023 KKR vs PBKS 2nd Match Live Score 
IPL

KKR vs PBKS : सामन्यात पावसाचा व्यत्यय, पंजाबचा 7 धावांनी विजय

Kiran Mahanavar

पावसाचा व्यत्यय

पंजाब किंग्जने केकेआरची अवस्था 7 बाद 146 धावा अशी झाली असताना पावसाला सुरूवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. सामना थांबवण्याची ही दुसरी वेळ ठरली. पहिल्यांदा लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सामना थांबला होता. आता पावसामुळे सामना थांबला. खेळ थांबला त्यावेळी केकेआरला 24 चेंडूत विजयासाठी 46 धावांची गरज होती.

केकेआरची आक्रमक सुरूवात मात्र...

पंजाब किंग्जच्या 191 धावांचा पाठलाग करताना केकेआरने पहिल्यापासूनच आक्रमक फलंदाजी केली. मात्र या आक्रमक फलंदाजीचा त्यांना फटका देखील बसला. पहिल्या 10 षटकापर्यंत केकेआरने 80 धावांपर्यंत मजल मारली मात्र यासाठी त्यांचे 4 फलंदाज खर्ची झाले.

122-2 (12.2 Ov) : राजपक्षा अर्धशतकानंतर बाद 

श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज भानुका राजपक्षाने 31 चेंडूत 50 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र पंजाब किंग्जला शतकी मजल मारून दिल्यानंतर तो बाद झाला. दुसऱ्या बाजूने कर्णधार शिखर धवन अँकर इनिंग खेळत आहे. त्याला जितेश शर्मा आक्रमक साथ देत आहे.

गब्बरच्या सेनेने पाच ओव्हर मध्ये ठोकल्या 50 धावा

पंजाब किंग्जने पाच षटकांत एक गडी गमावून 50 धावा केल्या आहेत. प्रभसिमरन सिंग बाद झाल्यानंतर शिखर धवनने धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाच षटकांनंतर पंजाबची धावसंख्या एका विकेटवर ५० धावा आहे.

KKR vs PBKS Live : शाहरुख खानच्या संघाने प्रीती झिंटाच्या टीमला दिला पहिला धक्का!

पंजाब किंग्जची पहिली विकेट 23 धावांवर पडली आहे. प्रभसिमरन सिंग 12 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

थोडक्यात जाणून घ्या... Playing 11

कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज, मनदीप सिंग, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टीम साऊदी, अनुकुल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज : शिखर धवन, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करण, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

KKR vs PBKS Live : शाहरुख खानच्या पट्ट्याने जिंकला टॉस!

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघ प्रथमच चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत आहे. गेल्या मोसमानंतर ब्रेंडन मॅक्क्युलमने कोलकाता प्रशिक्षकपद सोडले. कोलकाताचे चार परदेशी खेळाडू आंद्रे रसेल, रहमानउल्ला गुरबाज, टीम साऊथी आणि सुनील नरेन आहेत. त्याचवेळी पंजाबचे चार परदेशी खेळाडू भानुका राजपक्षे, सॅम करण, नॅथन एलिस आणि सिकंदर रझा आहेत.

IPL 2023 KKR vs PBKS 2nd Match Live Score : पंजाब किंग्जने आयपीएल 2023 ची विजयी सुरूवात केली. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा 7 धावांनी विजय मिळवला. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे निकाल हा डकवर्थ लुईस नियमाने देण्यात आला. पंजाबकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भेदक मारा करत 3 षटकात 19 धावा देत 3 बळी टिपले.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजपक्षेच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 191 धावा केल्या होत्या. त्याला कर्णधार शिखर धवनने 40 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या केकेआरने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंजाबने सुरूवातीपासूनच केकेआरला धक्के दिले.

त्यांची अवस्था 16 षटकात 7 बाद 146 धावा अशी केली. केकेआरला विजयासाठी 24 चेंडूत 46 धावांची गरज असताना पाऊस आला अन् सामन्या थांबला. मात्र डकवर्थ लुईन नियमानुसार सामना पंजाबने जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT