IPL 2023 LSG vs MI Playoff Scenario Marathi News 
IPL

IPL 2023: लखनऊच्या विजयानंतर RCB फायद्यात तर मुंबई इंडियन्सचे टेन्शन झाले दुप्पट! प्लेऑफचे समीकरण बदलले

IPL 2023: लखनऊच्या विजयानंतर RCBची लॉटरी! दोन विजय अन प्ले-ऑफमध्ये एन्ट्री; जाणुन घ्या समीकरण

Kiran Mahanavar

IPL 2023 Playoff Scenario : आयपीएल 2023चा 63वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनऊ संघाने मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक पद्धतीने 5 धावांनी पराभव केला. लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयाचा सर्वात मोठा फायदा आरसीबी संघाला झाला आहे.

त्याचवेळी मुंबई इंडियन्सचे टेन्शन दुप्पट झाले आहे. आरसीबी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला होता, मात्र आता त्यांनी जोरदार पुनरागमन केले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयानंतर प्लेऑफचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर आरसीबीला प्लेऑफमध्ये जाणे खूप सोपे झाले आहे. या सामन्यानंतर पॉइंट टेबलवर एक नजर टाकली तर लखनौचा संघ 13 सामन्यांत 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स 13 सामन्यांतून 14 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरली आहे. आरसीबीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या संघाने मुंबई इंडियन्सपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. 12 सामन्यांत 12 गुणांसह त्यांचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

आरसीबीने त्यांचे पुढील दोन सामने जिंकले तर त्यांचा संघ सहज प्लेऑफसाठी पात्र ठरेल. तसेच मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. सध्या RCB चा नेट रन रेट +0.166 आहे, तर मुंबईचा नेट रन रेट -0.128 आहे. जर मुंबईला प्लेऑफमध्ये जायचे असेल, तर त्यांना एकतर आरसीबीने किमान एक सामना हरवावा, अन्यथा आरसीबीकडून त्यांचा धावगती सुधारावी.

मुंबई इंडियन्सच्या संघावर बाहेर जाण्याचा धोका आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना पुढील सामना जिंकावा लागेल. यासोबतच त्याचा नेट रन रेटही सुधारावा लागेल. जर तो हे करू शकला नाही आणि RCB, लखनऊ आणि CSK च्या संघाने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT