IPL 2023 | Lucknow Super Giants and Delhi Capitals | Cricket News in Marathi sakal
IPL

IPL 2023: पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली संघासह वॉर्नरचीही परीक्षा! केएल राहुलचा संघ यंदाही ठसा उमटवणार?

पंत संघात नसला तरी दिल्ली संघाला हरवणे सोपे नाही कारण...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 Match 3 Lucknow Super Giants and Delhi Capitals : गत स्पर्धेत नव्याने दाखल झालेल्या लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रगती केली होती; परंतु आयपीएल विजेतेपदापर्यंत त्यांना मजल मारता आली नव्हती. यंदा मात्र मोठी मजल मारण्याच्या विश्वासाने त्यांचा संघ आज मैदानात उतरेल. मात्र रिषभ पंत संघात नसला तरी प्रतिस्पर्धी दिल्ली संघाला हरवणे सोपे नसेल.

अटलबिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर होणारा हा सामना दिल्ली संघासाठी भावनिक असणार आहे. गाडी अपघातात जबर दुखापत झालेला हुकमी खेळाडू रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही; परंतु त्याचा संपूर्ण संघ पंतच्या सन्मानासाठी लढताना दिसून येईल त्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूला ‘रिषभ पंत’ व्हावे लागणार आहे.

पंतच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली संघाला नव्याने रचना करावी लागणार आहे. डेव्हिड वॉर्नर हा त्यांचा नवा कर्णधार असला तरी वॉर्नरकडे आयपीएलचा अनुभव मोठा आहे. हैदराबाद संघाला त्याने २०१६ मध्ये विजेतेपद मिळवून दिले असल्यामुळे वॉर्नर संघाची उत्तमपणे उभारणी करू शकतो. मात्र फलंदाज म्हणून त्याला योगदान द्यावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात त्याला अजिबात प्रभाव पाडता आला नव्हता.

वॉर्नरच्या साथीला त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारीही मिशेल मार्श असणार आहे. भारत दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत त्याने सलामीला खेळताना कमालीची धडाकेबाज फलंदाजी केली होती. मात्र दिल्ली संघात पृथ्वी शॉ हा आणखी एक तडाखेबंद फलंदाज असल्यामुळे सलामीला कोण खेळ णार, हा प्रश्न असेल. कदाचित वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

दिल्ली संघाला सर्फराझ खान आणि यश धूल यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असतील.पंजाबची फलंदाजी, अर्थात कर्णधार केएल राहुलवर अवलंबून असेल. दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस यांचेही योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. गोलंदाजीत जयदेव उनाडकट, आवेश खान, मोहसिन खान, तर कृणाल पंड्या रवी बिष्णोई अशी त्यांची फिरकी गोलंदाजीतील ताकद आहे.

संघ यातून निवडणार :

लखनौ : केएल राहुल (कर्णधार), आयुष बदोनी, करन शर्मा, मनन व्होरा, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, कायले मेयर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मोसिन खान, मार्क वूड, मयांक यादव, रवी बिष्णोई, नवीन उल हक, अमित मिश्रा, डॅनियल सॅन्स, रोमारिओ शेफर्ड, यश ठाकूर, जयदेव उनाडकट आणि निकोरस पूरन.

दिल्ली : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल साल्ट, मनीष पांडे, सर्फराझ खान, अभिषेक पॉरेल, पृथ्वी शॉ, रोमवान पॉवेल, यश धूल, मिशेल मार्श, अश्रर पटेल, ललित यादव, अमन खान, ईशान शर्मा, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, प्रवीण दुबे आणि विकी ओस्तवाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT