MS Dhoni 
IPL

MS Dhoni: चार वर्षापूर्वी तेचं घडलं होत अन् आताही...धोनीचे स्वप्नं पावसामुळे उद्धवस्त होऊ शकते

चार वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

धनश्री ओतारी

आयपीएल 2023 चा 16व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (28 मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या जात आहे. पण आजही या सामन्यावर काळ्या ढगांचे सावट आहे. अंतिम सामना आणि पाऊस पाहाता धोनीसंदर्भात चार वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.( IPL 2023 MS Dhoni And Reserve Day Bring Back Harrowing Memories Of 2019 World Cup Semi final )

चारवर्षापूर्वी तेचं घडलं होत जे आता घडतं आहे. धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही पावसाने संपवली. राखीव दिवशी फलंदाजी करताना तो धावबाद झाला आणि टीम इंडियाला सामना गमवावा लागला. आता आयपीएलमध्येही असे होण्याची शक्यता क्रिकेट वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

2019 मध्ये काय झाले?

चार वर्षांपूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये होता आणि एकदिवसीय विश्वचषकात आश्चर्यकारक कामगिरी केली होती. रोहित आणि कोहलीच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने सहज उपांत्य फेरी गाठली. किवी संघाने प्रथम फलंदाजी करत 239 धावा केल्या.

भुवनेश्वरच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती आणि संघाला अंतिम फेरीत नेण्याची जबाबदारी फलंदाजांवर होती. रोहित आणि राहुलची जोडी क्रीझवर येण्यापूर्वी पाऊस पडला आणि त्या दिवशी खेळ झालाच नाही. अशा स्थितीत सामना राखीव दिवशी पोहोचला.

पावसामुळे किवीच्या वेगवान गोलंदाजांना इंग्लंडमध्ये बरीच मदत मिळत होती आणि भारताचे पहिले तीन फलंदाज अवघ्या एका धावेवर बाद झाले. पंत ३२ आणि कार्तिक सहा धावा करून बाद झाले. हार्दिकही 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर धोनीने रवींद्र जडेजासोबत शतकी भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन केले.

48व्या षटकात जडेजा 77 धावांवर बाद झाला, पण धोनी अर्धशतक झळकावत खेळत असल्याने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत राहिल्या. पुढच्याच षटकात धोनी धावबाद झाला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. टीम इंडिया हा सामना 18 धावांनी हरला आणि 2019 च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.

विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर धोनीने त्या वर्षी एकही सामना खेळला नाही. ऑगस्ट महिन्यात धोनीने लॉकडाऊनमध्येच निवृत्तीची घोषणा केली. अशाप्रकारे हा धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.

आयपीएलमधून निवृत्तीबाबत धोनीने म्हटले आहे की, आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मी याबाबत विचार करू. अशा परिस्थितीत धोनी या वर्षाच्या अखेरीस आयपीएलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT