IPL 2023 PBKS vs KKR Match 2 Kolkata Knight Riders Predicted Playing XI vs Punjab Kings  sakal
IPL

IPL 2023 : दुखापतींची साडेसाती, त्यात काही परदेशी खेळाडू घरी... पंजाब-कोलकता यांची सलामीलाच कसोटी

प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि दुखापतींचे दोघांसमोरही आव्हान

सकाळ ऑनलाईन टीम

Kolkata Knight Riders vs Punjab Kings IPL 2023 : दुखापतींची साडेसाती, त्यातच काही परदेशी खेळाडूंची अनुपलब्धता या चक्रव्यूहात सापडलेल्या पंजाब किंग्ज आणि माजी विजेते कोलकाता नाईटरायडर्स यांना आज यंदाच्या आयपीएलमधील आपल्या सलामीच्या सामन्यास सामोरे जायचे आहे.

या दोन्ही संघांत तसे काही नावाजलेले खेळाडू असायचे, आताही आहेत; परंतु कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याचा फटका त्यांना वारंवार बसलेला आहे. यंदा मात्र जुन्या चुका टाळून नवीन सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. गत स्पर्धेत पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर, तर कोलकाता नाईटरायडर्सची सातव्या स्थानापर्यंत घसरगुंडी झाली होती.

पंडित यांची कसोटी

रणजी क्रिकेट स्पर्धेत गेल्या काही वर्षांत ज्या संघांचे प्रशिक्षकपद सांभाळले, त्यांना विजेते करणारे मार्गदर्शक अशी चंद्रकांत पंडित यांची ओळख आहे. आयपीएलच्या महासागरात ते प्रशिक्षक म्हणून प्रथमच उतरले आहेत. कोलकता संघाला त्यांचा परिस्पर्श कशी प्रगती करणारा ठरतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे, पण त्यांच्यासमोरही आव्हानांचा डोंगर आहे.

श्रेयस अय्यरची अनुपस्थिती, त्यातच बांगलादेशचे शकिब अल हसन आणि लिटॉन दास यांची अनुपलब्धता त्यांना संघ रचना तयार करताना डोकेदुखी ठरणारी आहे. मात्र आंद्रे रसेल, सुनील नारायण, डेव्हिड विस, व्यंकटेश अय्यर हे खेळाडू त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतील. फर्ग्युसन आणि साऊदी हे न्यूझीलंडचे खेळाडू संघात दाखल झाले असले तरी ते उद्याच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

दोन्ही नवे कर्णधार

पंजाब तसेच कोलकाता हे दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. शिखर धवन प्रथमच पंजाबचे नेतृत्व करणार आहे, तर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी नितीश राणा सांभाळणार आहे. कागदावर तरी पंजाबचा संघ कोलकातापेक्षा वरचढ वाटत आहे; परंतु धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टॉची अनुपस्थिती त्यांना मोठ्या प्रमाणात जाणवू शकते.

सप्टेंबर महिन्यात पायाला झालेल्या दुखापतीतून बेअरस्टॉ अजून बरा झालेला नाही. त्यामुळे पूर्ण आयपीएल तो खेळू शकणार नाही. बेअरस्टॉची जागा मॅथ्यू शॉर्ट घेईल. बीगबॅश लीगमध्ये तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तो कर्णधार शिखर धवनसह सलामीला येईल.

पंजाब संघाचा आणखी एक हुकमी खेळाडू लिएम लिव्हिंगस्टोनला अजून इंग्लंड मंडळाने गुडघा दुखापतीनंतर खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला नाही तर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा राष्ट्रीय जबाबदारीमुळे अनुपलब्ध आहे. अशा परिस्थितीत पंजाब संघाची मदार टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या सॅम करनवर आहे. त्याच्या साथीला झिम्बाब्वेचा सिकंदर रझा असेल. अर्शदीप सिंग आणि रिषी धवन हे भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर पंजाबचे गोलंदाजीतील भवितव्य अवलंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT