SRH vs RCB Playing 11 : आयपीएलच्या लीग स्टेजमधील फक्त 6 सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत प्ले ऑफ गाठण्यात फक्त गुजरात टायटन्सलाच यश आले आहे. बाकी संघ आपले शेवटचे एक किंवा दोन सामने जिंकून प्ले ऑफचे तिकीट फानल करण्याच्या दृष्टीकोणातून शेवटचा जोर लावणार आहे.
आज आयपीएलच्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर सनराईजर्स हैदराबादशी त्यांच्या होम ग्राऊंडवर भिडणार आहे.
गुणतालिकेचा विचार केला तर सनराईजर्स हैदराबाद 12 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह तळात 10 व्या स्थानावर आहे. त्याचे प्ले ऑफ खळण्याचे स्वप्न कधीत धुळीस मिळाले आहे. दुसरीकडे आरसीबीने देखील 12 सामने खेळले असून त्यांनी 6 विजयासह 12 गुण मिळवले आहेत. जर त्यांना आपले प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर त्यांना आज सनराईजर्स हैदराबादचा पराभव करावाच लागणार आहे.
आरसीबीच्या फलंदाजीची भिस्त ही फाफ ड्युप्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर आहे. फाफ ड्युप्लेसिस सध्या 12 सामन्यात 631 धावा करत टॉप स्कोरर आहे. मात्र विराट कोहली जरी धावा करत असला तरी त्याचा स्ट्राईक रेट आणि कामगिरीतील सातत्य हा चिंतेचा विषय आहे. हैदराबादविरूद्ध या दोघांना फलंदाजीत पुन्हा एकदा चमक दाखवावी लागणार आहे.
RCB प्लेईंग 11 :
विराट कोहली, फाफ ड्युप्लेसिस, ग्लेम मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अर्जुन रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.
SRH प्लेईंग 11 :
अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंह, राहुल त्रिपाठी, एडिन माक्ररम, हेन्रिच क्लासेन, सानवीर सिंह, अब्दल समाद, मार्को जेनसेन, भुवनेश्वर कुमार, फझलहक फारूकी, मयांक मार्कंडेय, टी नटराजन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.