IPL

MI vs SRH : आयपीएलमधील भवितव्याचा आज फैसला! मुंबई संघ तळ्यात की मळ्यात?

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 MI vs SRH : तळ्यात-मळ्यात अशी वाटचाल करणारा मुंबई इंडियन्सचा संघ आता काठावर उभा आहे. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर आज वानखेडे स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध मोठ्या विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, अन्यथा गाशा गुंडाळावा लागणार आहे.

हैदराबाद संघाचे आव्हान अगोदरच संपुष्टात आले आहे. मुंबईसाठी पुढे जाण्याची संधी आहे, हैदराबादसाठी गमावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बेधडक खेळ होऊन त्यासाठी मुंबई संघाला सावध राहावे लागणार आहे.

मुंबई इंडियन्सला केवळ मोठा विजय पुरेसा ठरणार नाही तर सायंकाळी होणाऱ्या बंगळूर आणि गुजरात या सामन्यावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे हा सामना वानखेडे स्टेडियमवर या घरच्या मैदानावर होणार आहे. आतापर्यंत १३ सामन्यांत त्यांची निव्वळ सरासरी कधीच उणेच्या (-०.१२८) पलीकडे गेली नाही. यात सुधारणा करण्यासाठी आज मोठा विजय आवश्यक असेल.

आजचा सामना मुंबईने जिंकला आणि सायंकाळी होणाऱ्या गुजरातविरुद्धच्या लढतीत बंगळूरचा पराभव झाला तर मुंबईसाठी मार्ग मोकळा होईल; परंतु दोघांनीही आपापल्या लढती जिंकल्या तर निव्वळ सरासरीचा प्रश्न निर्माण होईल. मुंबईसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. एकाही सामन्यात समाधानकारक कामगिरी त्यांना करता आली नाही.

सर्वाधिक धोका क्लासेनचा

हैदराबदचा संघ पराभूत होत असला तरी गेल्या काही सामन्यांत हेन्रिक क्लासेनने भलतीच आक्रमक फलंदाजी केली आहे. गेल्या सामन्यात तर शतक केले होते. एकीकडे गोलंदाजांचा दुबळेपणा आणि दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघातील क्लासेनचा धडाका अशा परिस्थितीतून मुंबई संघाचे व्यवस्थापन कसा मार्ग काढणार, हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT