IPL 2023 PlayOff Scenario and Points Table sakal
IPL

IPL 2023 Playoffs Scenario: प्लेऑफमध्ये 3 स्थानांसाठी 5 संघ लढत! हा संघ पात्र ठरण्याच्या शर्यतीत आघाडीवर

प्लेऑफचे हे आहे समीकरण

Kiran Mahanavar

IPL 2023 Playoffs Scenario: आयपीएल 2023 मध्ये चाहत्यांना रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल 2023 ची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे. गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत प्लेऑफसाठी पात्र झाले आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सध्या 5 संघ गुणतालिकेत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी लढत आहेत.

1. मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध 5 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघ 13 सामन्यांतून 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. रेट रन रेट -0.128 आहे. आता मुंबईला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. मुंबईने शेवटचा सामना जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील.

2. आरसीबी

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 12 पैकी 6 सामने जिंकले असून 12 गुणांसह संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. संघाचा रेट रन रेट +0.166 आहे. आरसीबीला अद्याप सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. जर आरसीबीने हे दोन्ही सामने जिंकले तर त्याचे 16 गुण होतील.

3. पंजाब किंग्ज

पंजाब किंग्सने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि 12 गुणांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्जचे दोन सामने बाकी आहेत. पंजाब संघाने दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना जिंकल्यास त्याचे 16 गुण होतील.

प्लेऑफचे हे आहे समीकरण

गुजरात टायटन्सचा संघ प्रथम स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांनी पुढील सामना जिंकल्यास हे संघ दुसरे आणि तिसरे स्थान मिळवून प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मात्र चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. तिन्ही संघांना 16-16 गुण मिळतील. अशा स्थितीत रन रेटच्या आधारे चौथा संघ ठरेल.

आरसीबीचा धावगती मुंबई आणि पंजाबच्या संघापेक्षा जास्त आहे. या स्थितीत आरसीबी संघ चौथ्या स्थानावर राहून पात्र ठरू शकतो. दुसरीकडे सीएसके आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आपला शेवटचा सामना गमावल्यास, अशा स्थितीत पंजाब किंग्जसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Hitendra Thakur: तावडे पैसे देताना कुणाला घावले? २५ फोन, ५ कोटी अन् सर्व प्रकरण बाहेर काढणारे हितेंद्र ठाकूर कोण?

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Nanded South Assembly constituency : नांदेड-दक्षिण मतदारसंघात विजयश्री कोणाला घालणार माळ, नवीन चेहऱ्याचा ट्रेंड कायम राहणार का?

Flipkart Mobiles Bonanza Sale : महागड्या मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट; सुरू झाला फ्लिपकार्टचा Bonanza सेल, ऑफर्स पाहा

Satara Assembly Election 2024 : तुमच्यामुळेच संस्था अडचणीत; पसरणीत अरुणादेवी पिसाळ यांची टीका

SCROLL FOR NEXT