ipl 2023 rajasthan royals sakal
IPL

IPL 2023 Playoffs Scenario: पंजाबचा खेळ खल्लास! राजस्थानचे 14 गुण तरीही प्लेऑफच्या शर्यतीत; समजून घ्या गणित

राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफचे दरवाजे नाहीत बंद!

Kiran Mahanavar

IPL 2023 Playoffs Scenario Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी पंजाब किंग्सवर ४ विकेट राखून विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही त्यांचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील ‘प्ले-ऑफ’मधील स्थान अंधातरीच आहे. राजस्थान रॉयल्सने सातव्या विजयाला गवसणी घातली.

पंजाब किंग्सला आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा नेट रनरेट हा राजस्थान रॉयल्सपेक्षा चांगला असल्यामुळे या विजयानंतरही त्यांचा संघ पाचव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ अखेरच्या साखळी लढतीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यास तसेच मुंबई इंडियन्सचा संघही पराभूत झाल्यास राजस्थान रॉयल्सला प्ले-ऑफची आस बाळगता येणार आहे.

पंजाबकडून राजस्थानसमोर १८८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. कागिसो रबाडा याने जॉस बटलर याला शून्यावरच पायचीत बाद केले. बटलरचा सुमार फॉर्म कायम राहिला. फॉर्ममध्ये असलेला यशस्वी जयस्वाल व देवदत्त पडीक्कल या जोडीने राजस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली.

दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, ॲडम झाम्पा यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे राजस्थानने पंजाबची अवस्था ४ बाद ५० धावा अशी केली. प्रभसिमरन सिंग (२ धावा), अथर्व तायडे (१९ धावा), शिखर धवन (१७ धावा), लियाम लिव्हिंगस्टोन (९ धावा) हे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. सॅम करन व जितेश शर्मा या जोडीने ६४ धावांची भागीदारी करताना पंजाबचा डाव सावरला. सैनीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करताना जितेश ४४ धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार व ३ षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक ः पंजाब किंग्स २० षटकांत ५ बाद १८७ धावा (सॅम करन नाबाद ४९, जितेश शर्मा ४४, शाहरुख खान नाबाद ४१, नवदीप सैनी ३/४०, ॲडम झाम्पा १/२६) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स १९.४ षटकांत ६ बाद १८९ धावा (यशस्वी जयस्वाल ५०, देवदत्त पडीक्कल ५१, शिमरॉन हेटमायर ४६, कागिसो रबाडा २/४०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT