IPL 2023 PlayOff Scenario and Points Table sakal
IPL

IPL 2023 PlayOff Scenario : प्लेऑफच्या शर्यतीत मोठी उलटफेर! जाणून घ्या कुणी ठोकली मजबूत दावेदारी

प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चार संघांमध्ये रोमांचक शर्यत रंगणार आहे काही दिवसांपूर्वी जे संघ....

Kiran Mahanavar

IPL 2023 PlayOff Scenario and Points Table : आयपीएल 2023 मध्ये रोमांचक सामने खेळल्या जात आहेत. आता या हंगामाचा तो टप्पा सुरू झाला आहे, जेव्हा संघ एकमेकांशी स्पर्धा करत आहेत आणि दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत आहेत.

प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चार संघांमध्ये रोमांचक शर्यत रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी जे संघ अव्वल स्थानावर धावत होते ते आता खाली आले आहेत, तर तळाचे संघ आपले सामने जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत प्लेऑफची परिस्थिती काय असले, हे जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

आयपीएल 2023 च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर यावेळी आयपीएल 2022 चा चॅम्पियन संघ गुजरात टायटन्स आघाडीवर आहे. संघाने आतापर्यंत केवळ आठ सामने खेळले असून सहा जिंकले आणि 12 गुण मिळवले आहेत. या संघासाठी आता प्लेऑफची शर्यत खूपच सोपी दिसत आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर साखळी फेरीत जो संघ 16 गुणांची कमाई करतो, तो प्लेऑफमध्ये प्रवेश करतो. म्हणजेच गुजरात टायटन्सने त्यांच्या उर्वरित सहा सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकले तरी त्यांचे स्थान अव्वल 4 मध्ये कायम राहील.

यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने आपल्या आठपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुण आहेत. म्हणजेच उर्वरित सहा सामन्यांपैकी संघाला फक्त तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. प्लेऑफमध्येही या संघाचे स्थान जवळपास निश्चित दिसत आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ अजूनही पहिल्या चार क्रमांकामध्ये कायम आहे. संघाने आपले नऊ सामने खेळले असून पाच सामने जिंकून दहा गुण आहेत. म्हणजेच आता आरआरचे फक्त पाच सामने शिल्लक आहेत. यातील संघाला किमान तीन सामने जिंकावे लागणार आहेत. पण राजस्थान रॉयल्ससाठी चांगली गोष्ट म्हणजे संघाचा निव्वळ धावगती खूपच चांगला आहे,

दुसरीकडे एसएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने नऊपैकी पाच सामने जिंकून दहा गुण मिळवले असून संघाला पाचपैकी तीन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील.

या चार अव्वल संघांशिवाय आता पंजाब किंग्जचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि त्यांचे दहा गुणही आहेत, परंतु पंजाब किंग्जचा निव्वळ धावगती कमी आहे.

दुसरीकडे, जर आपण आरसीबीबद्दल बोललो तर ते आता सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आठपैकी चार सामने जिंकले असून त्यांचे आठ गुण आहेत. म्हणजेच आरसीबीला उर्वरित सहा सामन्यांपैकी किमान चार सामने जिंकावे लागतील. अन्यथा त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.

मुंबई इंडियन्सचा संघही आता प्लेऑफसाठी दावेदारी करताना दिसत आहे. संघाने आठपैकी चार सामने जिंकले असून आठ गुण आहेत. म्हणजेच त्यालाही उर्वरित सहा सामन्यांपैकी किमान चार सामने जिंकावे लागतील.

जर आपण KKR, SRH आणि दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोललो तर आता या तिन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टॉप 4 मध्ये पोहोचणे खूप कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT