ipl 2023 qualifier-2 mumbai indians defeat five reasons  sakal
IPL

Mumbai Indians: शुभमन गिलचा झेल... दुखापत... पॉवर हिटरचे अपयश...; जाणुन घ्या मुंबईच्या पराभवाची 5 कारणे

क्वालिफायर-2 मधील मुंबई इंडियन्सच्या पराभवामागील 5 कारणे

Kiran Mahanavar

IPL 2023 Mumbai Indians : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. 28 मे रोजी अंतिम फेरीत त्याचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

क्वालिफायर-2 मध्ये शुभमन गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 129 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 215 होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची सर्वात मोठी चूक म्हणजे शुभमन गिलचे झेल सोडणे. याशिवाय इशान किशन, रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांच्या दुखापतींचाही परिणाम झाला.

क्वालिफायर-2 मधील मुंबई इंडियन्सच्या पराभवामागील 5 कारणे

  • शुभमन गिलचा झेल - मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजीदरम्यान डेव्हिडने एक झेल सोडला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात शुभमन गिलचा हा झेल सोडला. त्यावेळी गिल अवघ्या 30 धावांवर फलंदाजी करत होता. एवढेच नाही तर शुभमन गिलला 8व्या षटकात 2 जीवदान मिळाले. गिलनेही या संधींचे भांडवल केले. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले.

  • मुंबईच्या खेळाडूंच्या दुखापती - या सामन्यातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचा संघही हैराण झाला होता. ख्रिस जॉर्डनच्या कोपराने इशान किशनच्या डोळ्याला दुखापत झाली. तो मैदानाबाहेर गेला आणि फलंदाजीही केली नाही. फलंदाजीचा क्रमही बदलावा लागला. याशिवाय रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनाही दुखापत झाली आहे. ग्रीनही दुखापतीमुळे निवृत्त झाला. मात्र नंतर फलंदाजीला आला.

  • सलामीवीर अपयशी - 234 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला पहिल्याच षटकातच धक्का बसला. मोहम्मद शमीने नेहल वढेराला 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने तिसऱ्याच षटकातच रोहित शर्माला 8 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टिळक वर्माने 14 चेंडूत 43 धावा ठोकल्या, पण पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर तो रशीद खानने बोल्ड झाला. पॉवरप्लेमध्ये मुंबईची धावसंख्या 3 बाद 72 अशी झाली.

  • विष्णू विनोद नंतर टीम डेव्हिडला पाठवले - कॅमेरॉन ग्रीन 20 चेंडूत 30 धावा करून बाद झाला तेव्हा मुंबईच्या 11.2 षटकात 4 बाद 124 धावा झाल्या होत्या. संघाला विजयासाठी 52 चेंडूत 109 धावांची गरज होती. अशा वेळी टीम डेव्हिडला पाठवण्याऐवजी विष्णू विनोदला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. तो फलंदाजीला आला असता, थोडा वेळ लागला असता तर सामन्याचा निकाल काहीही लागला असता.

  • सूर्यकुमार यादवचे आऊट होणे - सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 38 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. मोहित शर्माने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सूर्यकुमार बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 14.3 षटकांत 5 बाद 155 अशी होती. विजयासाठी 33 चेंडूत 78 धावा हव्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT