Sanju Samson 
IPL

Sanju Samson: लखनऊ विरुद्ध संजू बाबत खूप वाईट झालं; त्याग करूनही हाती पराभवच

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सध्या फॉर्ममध्ये आहे. पण...

धनश्री ओतारी

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 160 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याच्या फलंदाजीचाही या सीझनमध्ये राजस्थानला खूप फायदा झाला आहे. पण लखनऊ विरुद्ध बुधवारी १९ मार्चला संजूसोबत खूप वाईट झालं. क्रिकटे विश्वात सध्या त्याचीच चर्चा आहे.(Ipl 2023 Sanju Samson Wicket Turning Point For RR Vs LSG)

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनौने 155 धावांचे माफक आव्हान देखील डिफेंड करत राजस्थानला 10 धावांनी मात दिली. त्याग करूनही हाती संजूला पराभव मिळाला.

सॅमसन रनआऊट, नेमकं काय घडलं?

जोस बटलरला वाचवण्यासाठी त्याने आपली विकेट गमावली. पण त्याला चांगलेच महागात पडले. बटलरलाही राजस्थान जिंकता आला नाही. १३ व्या षटकादरम्यान, संजू सॅमसन अवघ्या दोन धावा देऊन धावबाद झाला.

बिश्वोईच्या गुगली चेंडूला फ्लिक करत बटलरने चेंडू खेळवला, धाव घेण्यासाठी दोन्ही खेळाडूंमधील समन्वय चांगला नव्हता, त्यामुळे संजू सॅमसनला उशीर झाला. डायव्हिंग करूनही सॅमसनला परतावे लागले.

संजू सॅमसनने बटलरसाठी आपल्या विकेटचे बलिदान दिले. इथून सारा सामना फिरला. सॅमसननंतर संघाला गळती लागली अन् त्याग करूनही हाती पराभव स्विकारावा लागला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात राजस्थानच्या संघाने धावांचा पाऊस पाडला होता. शेवटच्या 8 षटकात संघाच्या फलंदाजांनी 112 धावा केल्या होत्या. मात्र, बुधवारी हा संघ ६६ धावाही करू शकला नाही आणि सामना गमावला. या पराभवानंतरही राजस्थान अव्वल स्थानावर कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

MVA Seat Sharing Formula : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तिसऱ्यांदा बदलणार! थोरात म्हणाले, अजून बेरीज...

Hardik Pandya मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? आयपीएल रिटेंशनआधी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT