आयपीएल 2023 च्या 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबतच विराट कोहलीला आणखी एका धक्का बसला. बीसीसीआयने विराट कोहलीला दंड ठोठावला आहे. विराटवर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यंदाच्या या सीझनमध्ये केवळ विराटचं नव्हे तर अन्य खेळाडूही आहेत ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलमुळे झालेले कोट्याधीश खेळाडूंचे लाखोचे नुकसान झाले आहे. (IPL 2023 virat kohli Suryakumar Yadav Nitish Rana Hrithik Shokeen fined )
आयपीएलने आपल्या चालू मीडिया रिलीझमध्ये सांगितले की विराट कोहलीला बेंगळुरूमध्ये CSK विरुद्धच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराटने कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे.
सुर्यकुमार यादवला १२ लाखाचा दंड
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. आणि या बदल्यात त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सूर्यकुमार यादव हा आयपीएल 2023 मधला चौथा कर्णधार आहे ज्याला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचे नुकसान झाले आहे. त्याच्याआधी फाफ डु प्लेसिस, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्यालाही दंड ठोठावण्यात आला आहे.
नितीश राणाच्या मॅच फीत २५ टक्के कपात
केकेआरचा कर्णधार नितीश राणाला सामन्यादरम्यान मैदानावर अपशब्द वापरल्याबद्दल शिक्षा झाली आहे. मॅच रेफरीने त्याला आयपीएल आचार संहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे. त्याच्या मॅच फीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आली आहे.
हृतिक शॉकीनला मोठा दंड
नितीश राणाशिवाय मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीनलाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या मॅच फीमध्ये 10 टक्के कपात करण्यात आली आहे. त्याला आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 साठी दोषी ठरवण्यात आले आहे.
आयपीएलचा नियम कलम २.२ म्हणजे काय?
कलम 2.2 हा, सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, ग्राउंडवरील उपकरणे किंवा सहकारी किंवा प्रतिस्पर्ध्याशी गैरव्यवहार या संबंधित आहे. याआधी लखनौ सुपरजायंट्सच्या आवेश खानवरही या कलमाखाली कारवाई करण्यात आली होती. त्याने आरसीबी विरुद्ध विजय मिळल्यावर हेल्मेट जमिनीवर फेकले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.