Indian Premier League (IPL) Auction 2024 Updates News : आयपीएलचा लिलाव संपला आहे. या मिनी लिलावात 300 हून अधिक खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले होते. मात्र, त्यापैकी केवळ 72 खेळाडूंवरच बोली लावण्यात आली.
आयपीएल लिलावाच्या इतिहासात २० कोटी रुपयांची बोली अद्याप कोणत्याही खेळाडूवर लागलेली नव्हती. पण यंदा २० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले. मिचेल स्टार्क आता आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याने पॅट कमिन्सला मागे टाकले. पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
त्याच वेळी 39 खेळाडू करोडपती झाले. भारतातील हर्षल पटेल लिलावात सर्वात महाग विकला गेला. त्याला पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात समीर रिझवी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याला चेन्नई सुपर किंग्सने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला गुजरात टायटन्सने 10 कोटी रूपयात खरेदी केलं. त्याची बेस प्राईस ही 50 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने देखील त्याच्यासाठी आक्रमकपणे बोली लावली होती.
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल आता आरसीबीवासी झाली आहे. त्याला आरसीबीने 5 कोटी रूपये देऊन आपल्या गोटात खेचले.
उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या समीर रिझवीला यंदाच्या लिलावात 8.40 कोटी रूपयांची बोली लागली. चेन्नईने या अनकॅप्ड प्लेअरला आपल्या संघात सामील करून घेतलं.
राजस्थान रॉयल्सने शुभमन दुबेला 5.80 कोटी बोली लावत आपल्या गोटात खेचले. शुभम दुबे हा अनकॅप्ड खेळाडू असून तो विदर्भकडून खेळला आहे.
आता कॅप खेळाडूंचा सेट संपला आहेत. जे खेळाडू येथे विकल्या गेले नाहीत त्यांच्यावर पुन्हा बोली लागणार आहे. मात्र, या सर्व खेळाडूंवर पुन्हा बोली लावली जाणार नाही. यापैकी ज्या खेळाडूंची नावे फ्रँचायझी देतील त्यांनाच पुन्हा लिलावासाठी आणले जाईल.
पाचवा सेट फिरकी गोलंदाजाचा होता. यामध्ये त्या फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये मोहम्मद वकार, आदिल रशीद, अकिल हुसेन, ईश सोधी यांचा समावेश होता. पण यांच्या पैकी एकावर बोली लागली नाही.
मुंबई आणि दिल्लीने सुरुवातीला स्टार्कवर 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह बोली लावली. नंतर कोलकाता आणि गुजरात या शर्यतीत सामील झाले. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
हा सेट अशा वेगवान गोलंदाजांचा आहे ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे.
लॉकी फर्ग्युसन : न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजावर कोणत्याही संघाने बाली लावली नाही. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
चेतन साकारिया : चेतन साकारिया ज्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, त्याच किमतीत कोलकाता नाइट रायडर्सने तिला संघात घेतले.
अल्झारी जोसेफ : 1 कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले.
उमेश यादव : 2 कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या उमेशला गुजरात टायटन्सने 5.8 कोटी रुपयांना विकत घेतले.
शिवम मावी : 50 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या शिवम मावीला लखनऊ सुपर जायंट्सने 6.4 कोटी रुपयांना खरेदी केले.
जयदेव उनाडकट : ज्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, त्याला सनरायझर्स हैदराबादने 1.6 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले.
दिलशान मदुशंका : 50 लाखांची मूळ किंमत असलेल्या या खेळाडूला मुंबई इंडियन्सने 4.6 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले.
हा सेट त्या यष्टीरक्षक फलंदाजांचा आहे ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे.
फिलिप सॉल्ट : दीड कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या फिलिप सॉल्टला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
ट्रिस्टन स्टब्स : दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षकाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला या किमतीत खरेदी केले.
KS भरत : KS भरत ज्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, त्याच किमतीत कोलकाता नाइट रायडर्सने घेतले.
जोश इंग्लिस : कोणत्याही संघाने ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाला घेतले नाही, त्यांची मुळे किंमत 2 कोटी होती.
कुसल मेंडिस : कुसल मेंडिसवर कोणत्याही संघाने ५० लाखांची मूळ किंमत धरली नाही आणि त्यालाही या लिलावात विकले गेले नाही.
डेरिल मिशेलसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी रस दाखवला, ज्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. अखेर चेन्नईने या शर्यतीत सामील होऊन त्याला 14 कोटींना विकत घेतले.
गुजरात आणि पंजाबमध्ये हर्षल पटेलला दोन कोटी रुपयांची मूळ किंमत घेऊन खरेदी करण्याची स्पर्धा होती. अखेर पंजाब किंग्सने त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
चेन्नई आणि मुंबईने कमिन्सला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यात रस दाखवला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -
चेन्नई आणि हैदराबादने शार्दुल ठाकूरला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यात रस दाखवला. अखेर चेन्नईने त्याला 4 कोटींना विकत घेतले.
50 लाख रुपये मूळ किंमत असलेल्या रवींद्रला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि दिल्लीमध्ये शर्यत होती. चेन्नईने त्याला 1.8 कोटींना खरेदी केले. रवींद्रने एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडसाठी चांगली कामगिरी केली होती.
श्रीलंकेच्या फिरकीपटूची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये होती आणि हैदराबादने त्याला आपल्या संघात घेतले आहे. हसरंगावर इतर कोणत्याही संघाने बाली लावली नाही.
ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथ भारतीय दिग्गज करुण नायर आणि मनीष पांडे हे अनसोल्ड राहिले आहेत
चेन्नई आणि हैदराबादमध्ये ट्रॅव्हिस हेडसाठी चुरशीची लढत पाहिली मिळाली. त्याची मुळ किंमत 2 कोटी होती. अखेर सनरायझर्स हैदराबादने त्याला 6.8 कोटी रुपयांना विकत घेतले. हेडने वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले.
हॅरी ब्रूकसाठी दिल्ली आणि राजस्थान यांच्यात सामना पाहिला मिळाला. ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती आणि अखेरीस दिल्लीने त्याला 4 कोटी रुपयांना विकत घेतले.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रिले रुसोला पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला आहे.
1 कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या रोमन पॉवेलसाठी कोलकाता आणि राजस्थान यांच्यात चुरशीची लढत पाहिली मिळाली. अखेर राजस्थान संघाने त्याला ७ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले.
आयपीएल 2024 चा लिलाव सुरु झाला आहे. 70 खेळाडूंचा 10 वेगवेगळ्या सेटमध्ये लिलाव होणार आहे.
जोश हेझलवूड वगळता सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असतील. लिलावात हेजलवूडला विकत घेतल्यास सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, बहुतांश खेळाडू आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. परंतु जोश हेझलवूडसह ते खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसतील जे शेफिल्ड शिल्ड ट्रॉफीमध्ये भाग घेतील.
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यावेळी लिलावात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -
सनरायझर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी भाकीत केले आहे की, ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ लिलावात न विकला जाईल. मूडीच्या म्हणण्यानुसार, कोणतीही फ्रेंचायझी स्मिथला खरेदी करू इच्छित नाही.
आयपीएलमध्ये सहभागी होत असलेल्या १० संघांकडे एकूण २६२.९५ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम आहे. या लिलावात भारताचे २१४ व परदेशातील ११९ खेळाडू असणार आहेत. यामधील ११६ खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले असून २१५ खेळाडूंना अद्याप देशासाठी खेळता आलेले नाही. संलग्न देशातील दोन खेळाडूंचाही लिलावात समावेश करण्यात आला आहे. ७७ पैकी ३० जागा या परदेशी क्रिकेटपटूंसाठी असणार आहेत. २३ खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. १३ खेळाडूंची मूळ किंमत १.५ कोटी ठेवण्यात आली आहे. (It will be rain money today! 2 crores base price of 23 players)
गुजरात टायटन्स (३८.१५ कोटी), सनरायझर्स हैदराबाद (३४ कोटी), कोलकाता नाइट रायडर्स (३२.७ कोटी), चेन्नई सुपर किंग्स (३१.४ कोटी), पंजाब किंग्स (२९.१ कोटी), दिल्ली कॅपिटल्स (२८.९५ कोटी), रॉयल चॅलेंजर्स बेगळूरू (२३.२५ कोटी), मुंबई इंडियन्स (१७.७५ कोटी), राजस्थान रॉयल्स (१४.५ कोटी), लखनौ सुपर जायंट्स (१३.१५ कोटी). (Balance of Participating Franchises)
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, राचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, जेराल्ड कोएत्झी, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, हॅरी ब्रुक. (Watch these players)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.