IPL 2024 Auction Mohammed Shami Brother : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून भारतासाठी दमदार कामगिरी करत आहे. त्याचा छोटा भाऊ देखील क्रिकेट खेळतो. त्याने देखील आयपीएल 2024 च्या लिलावासाठी नोंदणी केली होती. मात्र दुर्दैवाने तो अनसोल्ड राहिला आहे.
मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ हा 27 वर्षाचा आहे. त्याला यंदाच्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायजींनी बोली लावली नाही. मोहम्मद शमीसोबतच त्याचा भाऊ देखील वेगवान गोलंदाजी करतो.
मोहम्मद कैफ बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने नुकतेच बंगालकडून अ श्रेणीचे 9 सामने खेळले आहेत. त्याने 2021 मध्ये अ श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मधील खेळाडूंचा लिलाव आज (दि. 19 डिसेंबर) रोजी दुबई येथे सुरू झाला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावात एकूण 333 क्रिकेटपटूंचा समावेश होता. 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आणि 119 परदेशी खेळाडू आहेत ज्यापैकी 2 सहयोगी राष्ट्रांचे आहेत. या यादीत 116 कॅप्ड खेळाडू, 215 अनकॅप्ड खेळाडू आणि 2 सहयोगी राष्ट्रांचे खेळाडू आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.