IPL 2024 Auction sakal
IPL

IPL 2024 Auction : उद्या पडणार पैशांचा पाऊस...! IPL 2024 च्या लिलाव संबंधित A टू Z माहिती फक्त सकाळवर

Kiran Mahanavar

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामचे वातावरण तापले आहे. मंगळवारी आयपीएल-2024 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात एकूण 333 खेळाडू सहभागी होत असून त्यापैकी केवळ 77 खेळाडूंची विक्री होणार आहे. कारण 10 संघांमध्ये तेवढ्याच जागा रिक्त आहेत.

यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवली आहे, तर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. काही खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच या लिलावात उतरणार आहेत.

IPL 2024 चा लिलाव केव्हा आणि कुठे पाहता येईल?

आयपीएल 2024 सीझनचा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर उपलब्ध असेल तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क त्याच्या विविध चॅनेलवर कार्यक्रम प्रसारित करेल.

यावेळी लिलावासाठी किती खेळाडू उपलब्ध आहेत?

एकूण 333 क्रिकेटपटूंचा लिलाव होणार असून त्यात 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2024 साठी लिलावकर्ता कोण असेल?

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला लिलाव करणार आहे. मल्लिका सागर या भूमिकेत असेल, ज्याने याआधी दोन महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये ही भूमिका साकारली आहे.

कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?

  • CSK : 31.4 कोटी

  • DC : 28.95 कोटी

  • GT : 15 कोटी रुपये

  • KKR : 32.7 कोटी

  • LSG : 13.9 कोटी

  • MI : 15.25 कोटी

  • PBKS : 29.1 कोटी रुपये

  • RCB : 40.75 कोटी

  • RR : 14.5 कोटी

  • SRH : 34 कोटी रुपये

कोणत्या संघांनी कोणते खेळाडू सोडलेले?

  • चेन्नई सुपर किंग्ज : आकाश सिंग, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, भगत वर्मा, ड्वेन पिटोरियस, काइल जेमिसन, सिनसादा मंगला आणि सुभ्रांशु सेनापती.

  • दिल्ली कॅपिटल्स : अमन खान, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, मनीष पांडे, मुस्तफिजुर रहमान, फिल सॉल्ट, प्रियम गर्ग, रिली रोसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान.

  • गुजरात टायटन्स : दासून शनाका, शिवम मावी, यश दयाल, केएस भरत, उर्विल पटेल, प्रदीप संगवान, ओडेन स्मिथ आणि अल्झारी जोसेफ.

  • लखनौ सुपरजायंट्स : जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, स्वप्नील सिंग, करण शर्मा, करुण नायर, अर्पित गुलेरिया आणि सुयश शेडगे.

  • मुंबई इंडियन्स : अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जेन्सन, जे रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.

  • कोलकाता नाईट रायडर्स : शार्दुल ठाकूर, उमेश यादव, शाकिब अल हसन, लिटन दास, डेव्हिड विस, आर्य देसाई, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खजरोलिया, लॉकी फर्ग्युसन, टिम साऊदी आणि जॉन्सन चार्ल्स.

  • पंजाब किंग्स : भानुका राजपक्षे, शाहरुख खान, मोहित राठी, बलतेज दांडा, राज बावा.

  • राजस्थान रॉयल्स : जो रूट, जेसन होल्डर, ओबेद मॅकॉय, अब्दुल बासित, कुलदीप यादव, एम अश्विन, केसी करिअप्पा, आकाश वशिष्ठ आणि केएल आसिफ.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव.

  • सनरायझर्स हैदराबाद : हॅरी ब्रूक, आदिल रशीद, अकिल हुसेन, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी आणि विव्रत शर्मा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT