SRH vs David Warner : आयपीएल 2024 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडू कोटीच्या कोटी उड्डाणे घेत होते. मात्र तिकडे डेव्हिड वॉर्नर आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील वितुष्ट अजून संपले नसल्याचे समोर आले आहे. डेव्हिड वॉर्नरने हैदराबादला 2016 ची आयपीएल जिंकून दिली होती.
दरम्यान, यंदाच्या लिलावात ट्रॅविस हेडला सनराईजर्स हैदराबादने विकत घेतल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने हेडचे अभिनंदन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हैदराबादने हेडला ब्लॉक केलं असल्यानं त्याला त्यांच्या पोस्टवर कमेंट करता आली नाही. याबाबतचा स्कीनशॉट डेव्हिड वॉर्नरने शेअर केला.
दुबईत सुरू असलेल्या आयपीएल 2024 मिनी लिलावात सनराईजर्स हैदराबादने हेडला 6.80 कोटी रूपयात खरेदी केलं. दरम्यान, सोशल मीडिायवर वॉर्नर त्याचं अभिनंदन करायला गेला अन् तेथे त्याला कळालं की सनराईजर्स हैदराबादने त्याला ब्लॉक केलं आहे.
सनराईजर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवलं होतं. त्याला हंगामाच्या अर्ध्यातच कर्णधारपद सोडावं लागलं होतं. विशेष म्हणजे संघ व्यवस्थापनाने वॉर्नरला बेंचवर देखील बसवलं होतं.
आयपीएल 2021 च्या लिलावात डेव्हिड वॉर्नर आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील नातं खूप खराब झालं होतं. त्याच्याकडून नेतृत्व काढून घेत केन विलियमसनकडे देण्यात आलं. त्याला संघातूनही बाहेर ठेवण्यात आलं. यावेळी वॉर्नरने सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती.
2022 च्या आयपीएलपूर्वी सनराईजर्स हैदराबादने त्याला रिलीज केलं. त्यावेळी देखील त्याने अनेक क्रिप्टिक पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर सनराईजर्स हैदराबादने त्याला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं आहे. वॉर्नर सध्या दिल्लीकडून खेळतोय.
(Sports Latest News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.