CSK vs GT IPL 2024 X/ChennaiIPL
IPL

IPL 2024, CSK vs GT: ऋतुराज अन्‌ गिल एकमेकांना भिडणार! कसा राहिलाय चेन्नई-गुजरातचा 'हेड टू हेड' रेकॉर्ड?

IPL 2024, CSK vs GT: आयपीएल 2024 स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

IPL 2024, CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग २०२४ हंगामात (IPL 2024) मंगळवारी (26 मार्च) गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स आणि गतउपविजेता गुजरात टायटन्स आमने-सामने येणार आहेत. त्याचमुळे ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या दोन युवा खेळाडूंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

चेन्नईत लढत रंगणार असून दोन्ही कर्णधार विजयी वाटचाल कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

महेंद्रसिंग धोनीने नेतृत्वपदावरून माघार घेतल्यानंतर ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले, तर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतल्यामुळे शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार झाला.

महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराजने सलामीच्या लढतीत अव्वल दर्जाचे नेतृत्व केले. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला बंगळूरविरुद्धच्या सलामीच्या लढतीत सूर गवसला नाही.

शार्दुल ठाकूर, मुकेश चौधरी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. मथीशा पथिराना हा वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त असल्यामुळे या लढतीसाठी चेन्नई संघात त्याचीही निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान शुभमन गिलनेही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उत्तम नेतृत्व करत गुजरातला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष राहिल.

आमने-सामने

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आत्तापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 2 सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहेत, तर 3 सामने गुजरात टायटन्स संघाने जिंकले आहेत.

हे दोन संघ गेल्यावर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यातही आमने सामने आले होते. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सने रोमांचक विजय मिळवला होता.

दोन्ही संघ -

  • चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, निशांत सिंधू, अजय मंडल, दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महिष तिक्षणा, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथिशा पाथिराना, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान, अविनाश अरवेल्ली.

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी, आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान, जोशुआ लिटिल, उमेश यादव, अझमतुल्लाह ओमरझई, सुशांत मिश्रा, मानव सुतार, कार्तिक त्यागी , स्पेन्सर जॉनसन, रॉबिन मिन्झ, शाहरुख खान, शरद बीआर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Election : निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील पराभूत; आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

Krishna Khopde : पूर्व नागपुरात ‘कृष्ण कमळ’ ला तोड सापडेना, सलग चौथ्यांदा विजय : कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीही हतबल

Rahul Kul: आमदार राहुल कुल यांची अनोखी हॅटट्रीक; मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार?

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

SCROLL FOR NEXT