IPL 2024 CSK vs RCB Playing-11 : इंडियन प्रीमियर लीग शुक्रवारपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. सर्व संघांची तयारी जोरदार सुरू आहे. खेळाडू सराव करत आहेत. आणि आपल्या रणनीतीवरही काम सुरू केले आहे.
पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसके आणि आरसीबी आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेची प्लेईंग इलेव्हन कशी असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने 2023 च्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आपला पहिला सामना घरच्या मैदानावर खेळणार आहे, जो त्याचा गड आहे. त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणे हे नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी मोठे आव्हान असते. यावेळीही सीएसकेला ते कायम राखायचे आहे.
पहिल्या सामन्यात सीएसकेसाठी सर्वात मोठी समस्या ही असेल की, त्यांचा सलामीचा फलंदाज डेवोन कॉनवे पहिले काही सामने खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत रचिन रवींद्रला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
रचिन रवींद्रने गेल्या एक वर्षात चांगली कामगिरी केली आहे, म्हणूनच सीएसकेने त्याचा संघात समावेश केला. दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाड असेल, यात शंका नाही.
यावेळी चेन्नई सुपर किंग्सने युवा फलंदाज समीर रिझवीचाही आपल्या संघात समावेश केला आहे. खरे तर सुरेश रैनाच्या निवृत्तीनंतर संघाला तिसऱ्या क्रमांकासाठी एकही विश्वासार्ह फलंदाज सापडलेला नाही. जो संघाच्या गरजेनुसार खेळू शकतो.
अशा परिस्थितीत समीर रिझवी ही पोकळी भरून काढू शकतील का? मात्र, तो पहिल्याच सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. याआधी अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकाची भूमिका साकारत आहे. यावेळीही त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळू शकते. संघाकडे शिवम दुबे, मोईन अली आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने अव्वल अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्याच्याकडे कधीही एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे. हे तिघे खेळणार हे जवळपास निश्चित आहे.
एमएस धोनीबाबत नेहमीच प्रश्न पडतो की तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल, मात्र महेंद्रसिंग धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. आणि तो विकेटच्या मागेही भूमिका बजावेल.
शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा सीएसकेमध्ये परतला आहे, तर दीपक चहरही तंदुरुस्त आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे. हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीत सुरुवात करतील आणि गरज पडल्यास फलंदाजीतही हात दाखवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. याशिवाय संघात महिषा तिक्षाना आणि मुस्तफिझूर रहमान आहेत, त्यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महिश तिक्षाना आणि मुस्तफिजुर रहमान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.