IPL 2024 first five matches: इंडियन्स प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेला शुक्रवारपासून (22 मार्च) सुरुवात झाली असून पहिले पाच सामने तीन दिवसात खेळून झाले आहेत. त्यामुळे सर्व 10 संघांचे प्रत्येकी 1 सामना खेळून झाला आहे. दरम्यान, या पाचही सामन्यात एक गोष्टीचे मात्र साम्य दिसून आले आहे.
या पाचही सामन्यांमध्ये ज्या संघांनी सामने जिंकले, त्या सर्व संघांनी घरच्या मैदानात सामने खेळले आहे. म्हणजेच पहिल्या पाच सामन्यात तरी घरच्या मैदानात खेळणाऱ्या संघांचाच बोलबाला राहिलेला दिसून आला आहे.
पहिला सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात चेन्नईतील एमए चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.
त्यानंतर शनिवारी दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात चंदिगढमधील मुल्लनपूरमधील महाराज यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने 4 विकेट्सने विजय मिळवला.
शनिवारीच तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात म्हणजेच इडन गार्डन्सवर झाला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने 4 धावांनी जिंकला.
रविवारी चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना यजमान राजस्थान रॉयल्स संघाने 20 धावांनी जिंकला.
त्याचबरोबर रविवारी पाचवा सामना गुजरात टायटन्सने घरचे मैदानात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 धावांनी जिंकला.
सर्व संघांचे एक-एक सामने खेळून झाल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या पाच संघांच्या खात्यात प्रत्येकी एका विजयासह 2 गुण आहे.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या पाच संघांना पहिल्या सामन्यातील पराभवामुळे त्यांच्या खात्यात शुन्य गुण आहेत. परंतु नेट रनरेटच्या फरकामुळे सध्या सर्व 10 संघांचे पहिल्या सामन्यानंतरचे गुणतालिकेतील स्थान निश्चित झाले आहे.
दरम्यान, सर्व संघांना साखळी फेरीत 14 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर गुणतालिकेतील पहिले 4 संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. पहिल्या दोन क्रमांकावरील संघ पहिला क्वालिफायर सामना खेळेल, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ एलिमिनेटर सामना खेळेल.
तसेच पहिल्या क्वालिफायरमधील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात पोहचेल, तर एलिमिनेटरमधील विजेता संघ आणि पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना होईल. दुसऱ्या क्वालिफायरमधील विजेता संघ अंतिम सामन्यात पोहचेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.